Thursday, October 29

सदाशिवनगरमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते १०१ वृक्षांचे वृक्षारोपण

IMG_20260924_224158


या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून परिसर हरित करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दरम्यान पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रज्योततात्या सालगुडे पाटील गणेश उत्सव मित्र मंडळ सदाशिवनगर यांना भेट देऊन गणेशोत्सवाच्या आयोजनाची माहिती घेतली. यावेळी गणेशोत्सव काळात सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि शांतता-सुव्यवस्था याबाबतही उपस्थितांशी संवाद साधण्यात आला.

IMG_20260924_223943


या कार्यक्रमास पंढरपूरच्या अपर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे, अकलूजचे पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके, माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलिस उपअधीक्षक विशाल नवले, नातेपुते पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, वेळापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच सदाशिवनगर व पुरंदावडे गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG_20260924_223839


१०१ वृक्षांचे वृक्षारोपण आणि गणेश मंडळाला पोलिस अधीक्षकांची भेट यामुळे सदाशिवनगर परिसरात पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक एकोपा आणि सार्वजनिक सहभागाचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *