Wednesday, October 28

Tag: Dnyanpravahnews

KEM हॉस्पिटलला अश्विनी पाटील यांचे ₹१०.२५ लाख परत करण्याचे आदेश; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
Maharashtra, Politics

KEM हॉस्पिटलला अश्विनी पाटील यांचे ₹१०.२५ लाख परत करण्याचे आदेश; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

₹१०.२५ लाखांच्या परताव्याचे आदेश! आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर निर्णय १५ दिवसांत १० लाख २५ हजार रुपये परत करण्याचे निर्देश पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क : धर्मादाय योजनेअंतर्गत उपचारांचा लाभ न मिळाल्याने पुण्यातील KEM हॉस्पिटलमध्ये १० लाख २५ हजार रुपये भरावे लागलेल्या अश्विनी सोमनाथ पाटील यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धर्मादाय सहआयुक्त तथा देखरेख समितीने संबंधित रुग्णालयाला १० लाख २५ हजार रुपये १५ दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश दिले आहेत. हा आदेश ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पारित करण्यात आला. आमदार अभिजीत पाटील यांनी विधान सभेच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्यासह धर्मादाय सहआयुक्तांकडे लेखी तक्रार करून या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. विधानसभेत रुग्णांच्या हक्कांचा प्रश्न उपस्थित आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि धर्मादाय योजनेसाठी पात्र असलेल्या रुग...
खाऊच्या पैशांपासून बँक खात्यापर्यंत! पंढरपूर अर्बन बँकेने विद्यार्थ्यांना दिला आर्थिक शिस्तीचा धडा
Maharashtra

खाऊच्या पैशांपासून बँक खात्यापर्यंत! पंढरपूर अर्बन बँकेने विद्यार्थ्यांना दिला आर्थिक शिस्तीचा धडा

पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या सहीने बँक खाते अभियान सुरू करण्यात आले. कर्मयोगी विद्यानिकेतन येथे उपक्रमाचा प्रारंभ; बचतीची सवय, आर्थिक शिस्त आणि बँकिंग व्यवहारांचे ज्ञान देण्यावर भर. विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पिगी बँक आणि खाऊचे वाटप. खाऊच्या पैशांतून घडणार आर्थिक शिस्त,पंढरपूर अर्बन बँकेचा विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम दहा वर्षे व त्यावरील विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या सहीने बँक खाते अभियानाचा प्रारंभ; कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये बचत आणि आर्थिक साक्षरतेचा धडा पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : खिशात मिळणारा खाऊचा पैसा,त्यातून केलेली छोटी बचत आणि स्वतःच्या सहीने चालवलेले बँक खाते… या छोट्या गोष्टींमधून उद्याच्या जबाबदार नागरिकांची आर्थिक जडणघडण होऊ शकते.विद्यार्थ्यां मध्ये लहान वयातच बचतीची सवय आर्थिक शिस्त आणि बँकिंग व्यवहारांची प्राथमिक...
करमाळ्यात मनोहर भोसले आणि विशाल वाघमारेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; मोका कायद्यान्वयेही कारवाई
Crime, Police

करमाळ्यात मनोहर भोसले आणि विशाल वाघमारेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; मोका कायद्यान्वयेही कारवाई

करमाळ्यात मनोहर भोसले आणि विशाल वाघमारेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; मोका कायद्यान्वयेही कारवाई मुलीच्या विवाहाचे आमिष आणि दैवी शक्तीच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप; पुण्यातील तक्रारदाराची ६ लाखोंचा ६१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा दावा करमाळा | ज्ञानप्रवाह न्यूज: मनोहर ऊर्फ मामा भोसले आणि त्याचा साथीदार विशाल ऊर्फ नाथबाबा वाघमारे यांच्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्यान्वये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गतही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा...
मुळेगाव तांड्यावर अवैध हातभट्टीवर पोलिसांचा छापा 5 लाख 41 हजारांचा मुद्देमाल नष्ट,4 सराईतांवर गुन्हे
Crime, Police

मुळेगाव तांड्यावर अवैध हातभट्टीवर पोलिसांचा छापा 5 लाख 41 हजारांचा मुद्देमाल नष्ट,4 सराईतांवर गुन्हे

मुळेगाव तांड्यावर पोलिसांची मोठी कारवाई! जेसीबीच्या सहाय्याने अवैध हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त; 5.41 लाखांचा मुद्देमाल नष्ट, चार जणांवर गुन्हे दक्षिण सोलापूरच्या मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांचा छापा; 5.41 लाखांचा मुद्देमाल नष्ट, चार सराईतांवर गुन्हे दाखल. सोलापूर|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७ ऑक्टोबर २०२६ : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याला आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायाविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी निर्मितीच्या ठिकाणी छापा टाकला. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. स...
पंढरपूरला स्वतंत्र RTO कार्यालयाचा मार्ग मोकळा? आ.समाधान आवताडेंच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश
Maharashtra

पंढरपूरला स्वतंत्र RTO कार्यालयाचा मार्ग मोकळा? आ.समाधान आवताडेंच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश

पंढरपूरला स्वतंत्र RTO कार्यालयासाठी आ.समाधान आवताडेंचा पाठपुरावा; मुख्यमंत्र्यांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश पंढरपुरात स्वतंत्र RTO कार्यालय सुरू करण्यासाठी आमदार समाधान आवताडेंचा पाठपुरावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर येथे स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सुरू करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी शासना कडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालयास ‘विशेष बाब’ म्हणून मंजुरी देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत परिवहन विभागाला याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले पडण...
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी ९ ऑक्टोबरला मोर्चा; शासन आदेश काढण्याची मागणी
Maharashtra

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी ९ ऑक्टोबरला मोर्चा; शासन आदेश काढण्याची मागणी

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी ९ ऑक्टोबरला कोल्हापुरात मोर्चा; १२ हून अधिक मागण्यांसाठी आंदोलन वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ तात्काळ कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी ९ ऑक्टोबरला कोल्हापुरात मोर्चा; निवृत्ती वेतन, घरकुल, आरोग्य व आर्थिक सहाय्याच्या मागण्या. कोल्हापूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ तात्काळ कार्यान्वित करावे, तसेच त्याबाबत शासन आदेश काढून कामगार विभागामार्फत राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी करावी, या प्रमुख मागणीसाठी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी वृत्त...
आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश; प्रथमेश पाटीलला सुवर्णपदक, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीसाठी निवड
Maharashtra, Sports

आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश; प्रथमेश पाटीलला सुवर्णपदक, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीसाठी निवड

आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश; प्रथमेश पाटीलला सुवर्णपदक, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीसाठी निवड आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश प्रथमेश पाटीलचे सुवर्णपदकासह ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत आयोजित आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विविध पदकांची कमाई केली. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या स्पर्धेत 65 ते 70 किलो वजनी गटात प्रथमेश अर्जुन पाटील याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.त्याच्या ...
Maharashtra

डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्याच्या गच्चीवर पहाटे तरुण;हातोडा,दोरी, हातमोजे सापडल्याची माहिती

डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील सिल्वर रॉक्स निवासस्थानाच्या गच्चीवर पहाटे तरुण घुसखोरी करताना आढळला.हातोडा,दोरी, हातमोजे सापडल्याची माहिती; पोलिस तपास सुरू. डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्याच्या गच्चीवर पहाटे तरुण;हातोडा,दोरी, हातमोजे सापडल्याची माहिती घटनेच्या वेळी डॉ.नीलम गोऱ्हे या बाहेरगावी होत्या.मात्र त्यांच्या निवासस्थानाच्या गच्चीवर पहाटेच्या वेळी अनोळखी व्यक्ती आढळल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुणे| ज्ञानप्रवाह न्यूज - डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, घराचा पाणीपुरवठा बंद झाल्याचे सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर पाण्याच्या टाकीची पाहणी करण्यासाठी सुरक्षा रक्षक शिडी वरून गच्चीवर गेला असता त्याला तेथे संबंधितांनी तरुण दिसला.यावेळी पाण्याचे कनेक्शन तोडलेले असल्याचेही आढळून आले. उपलब्ध सीसीटीव्ही चित्रणानुसार, संबंधि...
संगमनेर एमआयडीसीसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा
Maharashtra, mumbai

संगमनेर एमआयडीसीसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा

संगमनेरच्या साकुर-बोटा-पठार भागात एमआयडीसीसाठी हालचालींना वेग; सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याची आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी संगमनेर तालुक्यातील साकुर- बोटा -पठार भागात प्रस्तावित एमआयडीसीचे सर्वेक्षण लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी,अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.सहकारी औद्योगिक वसाहतीतील प्रश्न सोडविण्यासाठीही उद्योग विभागा कडे पाठपुरावा. संगमनेर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० सप्टेंबर २०२६ : संगमनेर तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देऊन रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी एमआयडीसी प्रशासन आणि उद्योग विभागाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. साकुर -बोटा-पठार भागातील प्रस्तावित एमआयडीसीसाठीचे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे एमआयडीसी...
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज-आमदार सत्यजीत तांबे
Breaking news

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज-आमदार सत्यजीत तांबे

पावसाअभावी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजनांना गती देण्याची मागणी दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मदत शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा; सत्यजीत तांबे यांचा शासनाला आग्रह महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत, पाणी, चारा, वीज आणि आवश्यक सवलतींचा लाभ वेळेत मिळावा,अशी मागणी केली. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा-पाणी, शेतीसाठी पाणी आणि वीजपुरवठ्यासह विविध उपाययोजनांना गती देण्याची गरज असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. मुंबई, दि. २६ सप्टेंबर २०२६ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची दखल घेत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.या निर्णयामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असून दुष्काळी भागांसाठी जाही...