Thursday, October 29

घरातील महिला सक्षम असेल तर कुटुंबाची प्रगती लवकर होते – श्रीकांत यादव

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील यशश्री क्लासेस येथे एलआयसी, प्रिती ऑनलाईन शॉप व तेज न्यूज यांच्यावतीने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२६ चा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्रीकांत यादव बोलत होते.

IMG_20260928_132649


यावेळी महसूल सहाय्यक अधिकारी राहुल सावंत,एलआयसीचे विकास अधिकारी बी.एस.चौगुले,सरपंच रणजित जाधव, सेवानिवृत्त तलाठी धोंडीराम शिंदे,सेवानिवृत्त अधिकारी बाळासाहेब कापसे, ज्येष्ठ पत्रकार आनंद देशपांडे, यशश्री क्लासेसचे संचालक प्रवीण लिंगडे, पांडुरंग नागरी पतसंस्थेच्या सचिव नूतन चौगुले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मिना माणिक कोले यांनी प्रथम क्रमांक पटकावत १ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मिळविले. पूनम सुनील माने यांनी द्वितीय क्रमांक मिळवत ७०० रुपये व प्रमाणपत्र तर जान्हवी घनश्याम कवडे यांनी तृतीय क्रमांक मिळवत ५०० रुपये व प्रमाणपत्र पटकावले.

याशिवाय उमा राजेंद्र शिंदे, संध्या संभाजी लोखंडे, किरण जयवंत भोसले, सोनाली विशाल माळी यांच्यासह एकूण १५ सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

गौरी-गणपती सजावट स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून पारंपरिक सण-उत्सवातील सर्जनशीलता आणि सहभागाला प्रोत्साहन मिळाल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची माळवदे यांनी केले. सूत्रसंचालन ओंकार माळवदे यांनी केले. आभार प्रशांत माळवदे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता कापसे,अनुजा देशपांडे, कोमल शिंदे,वर्षा गांधी,अथर्व चौगुले,अमृता चौगुले यांच्यासह सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *