Thursday, October 29

पुणे : शोभा धारीवाल यांना भामाशाह सन्मान, सुरेश शाह यांना जीवन गौरव पुरस्कार

IMG_20260928_135158_321


समाजातील दानशूर व्यक्तिमत्त्व श्राविका शिरोमणि श्रीमती शोभा ताई धारीवाल यांना मानाचा भामाशाह सन्मान प्रदान करण्यात आला.शोभा ताई धारीवाल यांनी जैन धर्म, समाज, मंदिर, स्थानक, जीवदया, शिक्षण, गौशाळा तसेच विविध शैक्षणिक संस्थांना उदार हस्ते मदत केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण दान,सेवा आणि समर्पणाच्या कार्याची दखल घेत त्यांना श्राविका शिरोमणि ही उपाधी प्राप्त झाली आहे.

IMG_20260929_141549


या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पंचरंगी दुपट्टा देऊन भामाशाह सन्मान प्रदान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ श्रावक शिरोमणि सुरेश शाह यांनाही जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांचे संपूर्ण जीवन समाजसेवा, जनकल्याण,जिन मंदिर निर्माण आणि धार्मिक कार्यासाठी समर्पित राहिले आहे. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक व धार्मिक योगदानाचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

IMG_20260928_192512


या सन्मान सोहळ्यास विमाननगर, वडगावशेरी आणि पुणे परिसरातील सकल जैन समाजाचे विविध घटक, महिला मंडळ तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

व्यासपीठावर मिलिंद फडे,अतुल शाह,डॉ.कल्याण गंगवाल,सिद्धार्थ दोशी,सुरेंद्र गांधी,सिद्धार्थ शाह, ममता जैन,रितेश जैन,सुरेश शाह, कैलाश ठोले,डॉ.राजेश तांगडे, डॉ.श्रीकुमार बुरसे,बाबूलाल कासलीवाल आणि देवेंद्र जैन यांच्यासह सकल जैन समाजाचे पदाधिकारी,ट्रस्टी आणि ज्येष्ठ श्रावक उपस्थित होते.

IMG_20260929_141757


आयोजकांनी सांगितले की,शोभाताई धारीवाल आणि सुरेश शाह यांसारख्या दानशूर व्यक्तींमुळे समाजातील अनेक धार्मिक व सामाजिक प्रकल्प पूर्णत्वास जातात. त्यांच्या पुण्य कार्याची आम्ही सर्वजण अनुमोदना करतो.

या सन्मान सोहळ्यानंतर समस्त जैन समाजाच्यावतीने शोभा ताई धारीवाल आणि सुरेश शाह यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

पुण्यातील सकल जैन समाजाच्या वतीने शोभा ताई धारीवाल यांना भामाशाह सन्मान तर सुरेश शाह यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *