महाभूमी ॲप स्टॅक म्हणजे काय? शेतकऱ्यांना आणि जमीनमालकांना मिळणार अनेक भूमी अभिलेख सेवा एका ठिकाणी
महाभूमी ॲप स्टॅक म्हणजे काय, ७/१२, ८अ, फेरफार, Property Card, ई-हक्क, ई-मोजणी आणि महाभूनकाशा सेवा कशा वापरायच्या? मोबाईलवर महाभूमी वापरण्याची संपूर्ण माहिती मुंबई : जमिनीशी संबंधित कागदपत्रे, ७/१२ उतारा, ८अ, फेरफार नोंद, मालमत्ता पत्रक यांसाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि भूमी अभिलेख विभागाने विविध डिजिटल सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांचे एकत्रित डिजिटल व्यासपीठ म्हणून महाभूमी (Mahabhumi) महत्त्वाचे ठरत आहे. मोबाईलच्या माध्यमातून जमीन अभिलेखाशी संबंधित माहिती मिळवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी महाभूमीच्या विविध ऑनलाइन सेवांचा वापर करता येतो. त्यामुळे शेतकरी, जमीनमालक, नागरिक तसेच जमीन व्यवहार करणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरते. महाभूमी ॲप स्टॅक म्हणजे काय? महाभूमी स्टॅक म्हणजे महाराष्ट्रातील भूम...

