Thursday, October 29

Tag: #पोलीसकारवाई

आजारी आईच्या देखभालीसाठी ठेवले पण घरातील सोन्याचे दागिने चोरीला,पंढरपूर पोलिसांची कारवाई; ५.५० तोळे सोने जप्त
Crime, Maharashtra, Police

आजारी आईच्या देखभालीसाठी ठेवले पण घरातील सोन्याचे दागिने चोरीला,पंढरपूर पोलिसांची कारवाई; ५.५० तोळे सोने जप्त

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क, दि.२६ ऑक्टोबर २०२६ : घरातील आजारी आईची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवलेल्या महिलेने घरातील लपवलेल्या चावीचा वापर करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरल्याचा प्रकार पंढरपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास करत पंढरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ५.५० तोळे वजनाचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.वनिता समाधान कांबळे रा. टाकळी रोड पंढरपूर असे या प्रकरणातील आरोपी महिलेचे नाव पोलिसांनी दिले आहे. जुन्या कराड नाक्यावरील घरातून दागिने चोरीला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन ज्ञानेश्वर ताटे रा.जुना कराड नाका पंढरपूर यांनी घरातील कपाटात सोन्याचे दागिने ठेवले होते.कपाटाची चावीही घरात ठेवण्यात आली होती. २९ जून २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने कपाटातील ५.५० तोळे वज...
अक्कलकोटमध्ये ऊसाच्या शेतात गांजाची शेती! २४० झाडे जप्त, किंमत तब्बल १ कोटी ५ लाख
Crime, Police

अक्कलकोटमध्ये ऊसाच्या शेतात गांजाची शेती! २४० झाडे जप्त, किंमत तब्बल १ कोटी ५ लाख

सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई; आळगी येथील ऊसाच्या शेतातून २११ किलो गांजा जप्त,६० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा अक्कलकोटच्या आळगी येथे ऊसाच्या शेतातून २११ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त. २४० झाडांची लागवड उघड; मुद्देमालाची किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये. अक्कलकोट|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ सप्टेंबर २०२६ : सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मौजे आळगी, ता. अक्कलकोट येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची २४० झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई २८ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आली. गोपनीय माहितीवरून पोलिसांची धडक कारवाई सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार...
सोलापुरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक;सोन्याचे दागिने, रोकड,मोटारसायकल जप्त
Crime, Maharashtra, Police

सोलापुरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक;सोन्याचे दागिने, रोकड,मोटारसायकल जप्त

सोलापूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी व चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक; सोन्याचे दागिने, रोकड, साडी आणि मोटारसायकलसह ₹७८ हजारांचा मुद्देमाल जप्त. सोलापुरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक; सोन्याचे दागिने,रोकड आणि मोटारसायकल जप्त CCTV फुटेजने उलगडला घरफोडीचा तपास; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात,७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज : घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांतील पाहिजे असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.नितीन बाबू भोसले आणि कमलाकर यशवंत पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, साड्या आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि.२४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० ते २५ ऑगस्ट रोजी सकाळी ७...