Thursday, October 29

Tag: #महाराष्ट्र

स्पर्धा परीक्षेतील विलंबामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची?
Editorial, संपादकीय

स्पर्धा परीक्षेतील विलंबामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची?

पदवी मिळाली, वर्षे गेली; तरी नोकरी नाही! महाराष्ट्रातील तरुणांच्या संघर्षाला जबाबदार कोण? परीक्षा, आंदोलन आणि अनिश्चित भविष्य; स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेत बदल कधी? एका परीक्षेसाठी अनेक वर्षे; पण निकालाची खात्री नाही! एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणाची कल्पना करा. मुलगा किंवा मुलगी पदवीचे शिक्षण पूर्ण करते. त्यानंतर सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू होते. आई-वडील घरखर्चाला कात्री लावतात, शेतीतून मिळणारे उत्पन्न किंवा पगारातील काही रक्कम मुलाच्या शिक्षणासाठी बाजूला ठेवतात. पुस्तके, क्लासेस, वसतिगृह, प्रवास आणि परीक्षांचे शुल्क यावर खर्च होतो. एक वर्ष जाते, दुसरे वर्ष जाते, तिसरेही वर्ष संपते. परीक्षा कधी जाहीर होणार, भरती कधी पूर्ण होणार, निकाल कधी लागणार आणि नियुक्तीपत्र कधी मिळणार, याची उत्तरे मात्र अनिश्चित राहतात. या काळात वय वाढते, आर्थि...
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी ९ ऑक्टोबरला मोर्चा; शासन आदेश काढण्याची मागणी
Maharashtra

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी ९ ऑक्टोबरला मोर्चा; शासन आदेश काढण्याची मागणी

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी ९ ऑक्टोबरला कोल्हापुरात मोर्चा; १२ हून अधिक मागण्यांसाठी आंदोलन वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ तात्काळ कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी ९ ऑक्टोबरला कोल्हापुरात मोर्चा; निवृत्ती वेतन, घरकुल, आरोग्य व आर्थिक सहाय्याच्या मागण्या. कोल्हापूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ तात्काळ कार्यान्वित करावे, तसेच त्याबाबत शासन आदेश काढून कामगार विभागामार्फत राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी करावी, या प्रमुख मागणीसाठी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी वृत्त...
संगमनेर एमआयडीसीसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा
Maharashtra, mumbai

संगमनेर एमआयडीसीसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा

संगमनेरच्या साकुर-बोटा-पठार भागात एमआयडीसीसाठी हालचालींना वेग; सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याची आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी संगमनेर तालुक्यातील साकुर- बोटा -पठार भागात प्रस्तावित एमआयडीसीचे सर्वेक्षण लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी,अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.सहकारी औद्योगिक वसाहतीतील प्रश्न सोडविण्यासाठीही उद्योग विभागा कडे पाठपुरावा. संगमनेर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० सप्टेंबर २०२६ : संगमनेर तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देऊन रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी एमआयडीसी प्रशासन आणि उद्योग विभागाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. साकुर -बोटा-पठार भागातील प्रस्तावित एमआयडीसीसाठीचे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे एमआयडीसी...
गुंठेवारीच्या नावाखाली नागरिकांचे हेलपाटे नकोत; आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना
Maharashtra, Political Press Conferences

गुंठेवारीच्या नावाखाली नागरिकांचे हेलपाटे नकोत; आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

संगमनेरमध्ये गुंठेवारीच्या ३०० प्रकरणांना वेग; दोन महिन्यांत पात्र अर्ज निकाली काढण्याचे सत्यजीत तांबे यांचे निर्देश गुंठेवारीच्या नावाखाली नागरिकांचे हेलपाटे नकोत; सत्यजीत तांबे यांनी प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना संगमनेर नगरपालिकेतील गुंठेवारीची ३०० ते ३५० प्रकरणे दोन महिन्यांत निकाली काढण्याच्या सूचना आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रशासनाला दिल्या. नागरिकांना अनावश्यक हेलपाटे टाळण्यासाठी मार्गदर्शन, मनुष्यबळ वाढवणे आणि मोजणीच्या अडचणी दूर करण्यावर भर. संगमनेर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ सप्टेंबर २०२६ : संगमनेर नगर पालिकेत गुंठेवारी अंतर्गत पूर्ण झालेल्या १० प्रकरणांतील प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष मोहम्मद भाई, मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगरसेवक - नगरसेविका तसेच नगरपालिका प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम प...
सरकारी योजना आता थेट गावाच्या दारात; पंढरपूर तालुक्यात सेवा संकल्प अभियान ला सुरुवात
Maharashtra, Politics

सरकारी योजना आता थेट गावाच्या दारात; पंढरपूर तालुक्यात सेवा संकल्प अभियान ला सुरुवात

फक्त योजना सांगणार नाही, थेट लाभ मिळवून देणार; पंढरपूरमध्ये सेवा संकल्प अभियान चा शुभारंभ पंढरपूर तालुक्यात सेवा संकल्प अभियान ला सुरुवात.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर सरकारी योजनांचा लाभ, नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित कामांवर प्रशासनाचा भर पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज: सरकारी सेवा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी तसेच गावागावातील स्थानिक गरजा ओळखून विकासकामांना लोकसहभागाची जोड देण्यासाठी पंचायत समिती पंढरपूरच्या वतीने सेवा संकल्प अभियान सुरू करण्यात आले आहे. पंचायत समितीच्या शेतकी भवन सभागृहात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर पंचायत समितीचे सभापती डॉ शुभम आगावणे होते. प्रमुख अतिथी म्हणू...
सांगोला तालुक्यात बेकायदेशीर जुगार अड्ड्या वर पोलिसांचा मोठा छापा; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Crime, Maharashtra, Police

सांगोला तालुक्यात बेकायदेशीर जुगार अड्ड्या वर पोलिसांचा मोठा छापा; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगोला तालुक्यात बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त सोनंदमध्ये जुगार अड्ड्यावर धडक कारवाई;२१ आरोपींवर गुन्हा, लाखोंचा मुद्देमाल जप्त सांगोला |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दी तील मौजे सोनंद,ता.सांगोला येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली. १७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत जुगाराचे साहित्य,रोकड, मोबाईल फोन तसेच दुचाकी व चारचाकी वाहने असा एकूण ३६ लाख १२ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत एकूण २१ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील कलम १२(अ) अन्वये ही कारवाई करण्यात आली. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्ण...