Thursday, October 29

Tag: #SolapurNews

पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ निर्माण झाला आहे ; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या.भगीरथ भालके यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन
Maharashtra, Politics

पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ निर्माण झाला आहे ; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या.भगीरथ भालके यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन

पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर-मंगळवेढ्यात दुष्काळी संकट; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या – भगीरथ भालके पंढरपूर-मंगळवेढा परिसरात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत, चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी भगीरथ भालके यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ : ऐन पावसाळ्याच्या दिवसांत पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेचे नेते भगीरथ भालके यांनी आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे समक्ष भेटून निवेदनाद्...
मंगळवेढ्यात प्लॉटच्या वादातून महिलेला मारहाण; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime, Maharashtra, Police

मंगळवेढ्यात प्लॉटच्या वादातून महिलेला मारहाण; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात प्लॉटच्या वादातून महिलेला मारहाण; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल तक्रार केली तर अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करू असा धमकीचा आरोप; मंगळवेढ्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा मंगळवेढ्यात प्लॉटच्या वादातून आशा सुपरवायझर महिलेला मारहाण, शिवीगाळ व धमकी; गळ्यातील सोन्याचे गंठण ओढून नेल्याचा आरोप. १२ जणांविरुद्ध BNS कलमांनुसार गुन्हा दाखल. मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : प्लॉटच्या वादातून एका महिलेला बोलावून शिवीगाळ, मारहाण, धमकी तसेच गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढून नेल्याचा प्रकार मंगळवेढा शहरात घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिता राजू काळुंगे वय ४०, व्यवसाय आशा सुपरवायझर, रा.कचरेवाडी,ता.मंगळवेढा यांना दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमार...
सोलापूर जिल्ह्यात चारा बंदी आदेश लागू;बाहेर चारा नेल्यास थेट फौजदारी कारवाई-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांचा आदेश
Maharashtra

सोलापूर जिल्ह्यात चारा बंदी आदेश लागू;बाहेर चारा नेल्यास थेट फौजदारी कारवाई-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांचा आदेश

कमी पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय; पशुधनासाठी चारा राखण्यावर भर सोलापूर जिल्ह्यात चारा बंदी! बाहेर चारा नेल्यास थेट फौजदारी कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर आदेश,कमी पावसाचा मोठा परिणाम; सोलापूरचा चारा बाहेर नेण्यास बंदी, पशुधनासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा जिल्ह्याबाहेर व परराज्यात नेण्यास बंदी. जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा. सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज: पावसातील खंड आणि कमी पर्जन्यमानामुळे सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी उपलब्ध असलेला चारा जिल्ह्याबाहेर जाऊ नये आणि स्थानिक पशुपालकांना चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. सोलापूरचे जिल्हाधिका...
उजनीच्या पाण्यात मँगनीज अधिक ? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल; वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स
Maharashtra

उजनीच्या पाण्यात मँगनीज अधिक ? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल; वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स

उजनी प्रदूषण प्रकरणी NHRC चा दणका! MPCB अध्यक्ष आणि आरोग्य सचिवांना समन्स; १६ ऑक्टोबरपर्यंत अहवालाचे आदेश उजनीच्या पाण्यात मँगनीज अधिक ? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल; वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स उजनी प्रदूषण प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि आरोग्य सचिवांना समन्स बजावले. १६ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश ८ महिन्यांत तीन स्मरणपत्रे देऊनही अहवाल नाही; २३ ऑक्टोबरला आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज,२४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. या प्रदूषणामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य परिणाम होत असल्याच्या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने NHRC गंभीर दखल घेतली आहे. संबंधित चौकशी अहवाल वारंवार...
पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना; लाभ घेण्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन
Maharashtra

पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना; लाभ घेण्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन

पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना; लाभ घेण्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन लोकसंवाद-२०२६ उपक्रमातून शासकीय योजनांची माहिती; विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इंटरनेटच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४ : शहरी भागातील नागरिकांचे राहणीमान उंचावणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्यावतीने विविध शासकीय आणि स्थानिक पातळीवरील कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांचा शहरातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले. गणेशोत्सवातील भक्तिमय वातावरणाला लोकहिताच्या संवादाची जोड देत शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती पोहोचविण...
सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; चेन स्नॅचिंग सह जनावर चोरीचे गुन्हे उघड,मुद्देमाल जप्त
Crime, Maharashtra, Police

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; चेन स्नॅचिंग सह जनावर चोरीचे गुन्हे उघड,मुद्देमाल जप्त

अकलूज | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० सप्टेंबर २०२६ : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चैन स्नॅचिंग आणि जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास लवंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे फिर्यादीची आई व आजी झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी व सोन्याचे कर्णफुले चोरून नेली होती. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९७/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ३० मे २०२६ रोजी रात्री ११.३० ते ३१ मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान गणेशनगर, ता. माळशिरस येथील घरासमोरून चार शेळ्या आणि पाच बोकडे चो...