Wednesday, October 28

कुर्डुवाडीत ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात; ३०८ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव

IMG_20260917_183848

पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी आणखी वाढते,असे प्रतिपादन विद्याविकास मंडळ करमाळ्याचे सचिव प्रा.विलास घुमरे यांनी केले. कुर्डुवाडीतील तुळजाई लॉन्स अँड लॉजिंग बार्शी नाका करमाळा रोड येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

प्रा.विलास घुमरे म्हणाले की, पुरस्कारार्थींची निवड पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे. आदर्श या शब्दाला साजेशी गुणवत्ता, सूक्ष्म अभ्यास, परीक्षण, निरीक्षण आणि उपक्रमशीलता या बाबींचा विचार करून निवड प्रक्रिया पार पडल्याने या पुरस्काराचे विशेष महत्त्व आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे संबंधित शिक्षकांची जबाबदारी वाढते तसेच भविष्यात अधिक चांगले कार्य करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक व स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ.बी.पी.रोंगे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर भाष्य केले.पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे पार्श्वभूमीवर त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी केली.

शासन दरबारी शिक्षकांचे प्रश्न व्यवस्थितपणे मांडून ते सोडविण्या साठी ठोस आराखडा तयार करून सादर करणे आवश्यक असल्याचे डॉ.रोंगे यांनी सांगितले.स्वेरीचे विद्यार्थी ज्या पद्धतीने करिअरमध्ये यश मिळवत आहेत, त्याचप्रमाणे शिक्षकांचे प्रश्नही अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडविण्यासाठी आपण सक्षम असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

तीन तालुक्यांतील ३०८ जणांचा गौरव

माढा, बार्शी आणि करमाळा या तीन तालुक्यांतील एकूण ३०८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यामध्ये माढा तालुक्यातील ११८, बार्शीतील १२६ आणि करमाळा तालुक्यातील ६४ पुरस्कारार्थींचा समावेश होता.

IMG_20260917_183718

दुपारी दोन वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम तब्बल पाच तास चालला. शाळा व्यवस्थापन मंडळांचे पदाधिकारी,प्राचार्य,मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी श्री भैरवनाथ प्रतिष्ठान करमाळ्याचे संस्थापक अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. जयप्रकाश बिले,शिवाजी शिक्षण मंडळ बार्शीचे खजिनदार जयकुमार शितोळे,श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे संस्थापक डॉ.एम.पी.सुरवसे, अर्णव शिक्षण संकुल वैरागचे सचिव रविंद्र कापसे,गुरुकुल विद्यालय पांडेचे अध्यक्ष नितीन भोगे,भारत शिक्षण प्रसारक मंडळ जेऊरचे सचिव अर्जुन सरक, कै.शोभाताई सोपल विद्यालय घाणेगावचे शिक्षक प्रतिनिधी निवृत्ती साठे तसेच अर्जुन खटके, भारत माने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

फेटा,सन्मानचिन्ह आणि कुटुंबीयांसह आठवणींचा क्षण

पुरस्कारार्थींना स्मृतिचिन्ह,शाल, श्रीफळ, मानपत्र आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना अनेकांनी कुटुंबीयांसह डॉ.बी.पी.रोंगे यांच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी गर्दी केली. पुरस्कारार्थींनी फेटा परिधान केल्याने संपूर्ण सोहळ्याला विशेष आकर्षक स्वरूप प्राप्त झाले होते.

IMG_20260917_183623

डॉ.बी.पी. रोंगे यांच्या उमेदवारी बाबत अनेक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत त्यांचा सत्कारही केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना साठी स्वेरी पंढरपूर व एसव्हीआयटी सोलापूरच्या संयोजन समितीसह तिन्ही तालुक्यांतील संयोजक व सदस्यांनी परिश्रम घेतले.प्रा.यादव पनसवाड यांनी सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.

आदर्श ज्ञानयात्री पुरस्कारासाठी फेटा परिधान केलेले पुरस्कारार्थी विशेष रुबाबदार दिसत होते.

स्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ,मानपत्र व प्रमाणपत्र स्वीकारताना पुरस्कारार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

डॉ.रोंगे यांच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त करत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.

स्वादिष्ट भोजनामुळे पुरस्कारार्थी, कुटुंबीय आणि पालकवर्गातही उत्साहाचे वातावरण होते.

कुर्डुवाडीत स्वेरी व एसव्हीआयटी च्यावतीने ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात;माढा,बार्शी, करमाळा तालुक्यांतील ३०८ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *