Thursday, October 29

पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित

श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिराच्या पश्चिमद्वार परिसरात १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजपा पंढरपूर-मंगळवेढा विधान सभा प्रभारी अक्षय वाडकर यांच्या पुढाकाराने आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशसेवेच्या कार्याला नागरिकांच्या शुभेच्छा व आशीर्वाद मिळावेत, यासाठी प्रार्थना करण्यात आली.

IMG_20260920_154820

सेवा संकल्प अभियान च्या माध्यमातून सुशासन,गरीब कल्याण आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देण्यात येत आहे.

पंढरपूरमधील या उपक्रमाला अक्षय वाडकर,अमर बाबर,नरसिंह परंडकर, अनिकेत मस्के, नचिकेत सांगोलकर,दीपक चव्हाण यांच्या सह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *