Thursday, October 29

२,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा;क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाच्या कार्याचे डॉ. विश्वजीत कदमांकडून कौतुक

IMG-20260924-WA0017


म्हसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाला आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संकुलाची पाहणी करून त्यांनी शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

IMG-20260924-WA0014


यावेळी कुंडलचे ज्येष्ठ नेते किरण लाड,कुंडलिक नाना येडके,म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी,सोमनाथ भोसले, विशाल बागल,संजय बागल, अखिल काझी,डॉ.उज्ज्वल कुमार काळे तसेच संस्थेच्या सचिव व मुख्याध्यापिका सौ. सुलोचना बाबर, क्रांतीवीर इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य विन्सेंट जॉन, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विठ्ठल लवटे, विजय बनसोडे,अनिल लोखंडे, महेश करचे, सागर सावंत,पंकज पोळ, वसंतराव शिर्के, दाऊद मुल्ला यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आजच्या काळात शैक्षणिक संस्था अनेकदा केवळ जाहिरातबाजी पुरत्या मर्यादित राहतात. मात्र, विद्यार्थ्यांना आणि पालकांना योग्य दिशा देण्याचे काम संस्थांनी करणे आवश्यक असून आदरणीय स्व. पतंगराव कदम साहेबांनी आयुष्यभर जात, धर्म आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन लोकांना मदत करण्याची शिकवण दिली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शैक्षणिक कार्याची सुरुवात करण्यात आली,असे त्यांनी सांगितले.

IMG-20260924-WA0016


कृषीरत्न प्रा.विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर दाम्पत्याने अत्यंत कष्टाने क्रांतीवीर शैक्षणिक संस्था ही नामांकित संस्था उभी केल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या आदरातिथ्याने झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा माणदेशी काठी आणि घोंगडं देऊन क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाच्यावतीने नागरी सन्मान केला.

यावेळी विश्वंभर बाबर यांनी पूर्वीच्या संवाद पदयात्रेच्या आठवणींना उजाळा देत संस्थेच्या कार्यामागील प्रेरणा स्पष्ट केली. शिक्षण आणि विचारांचा धागा राजकारणापासून बाजूला ठेवून संस्थेचे काम पुढे नेण्याबाबत त्यांनी भूमिका मांडली.तसेच भारती विद्यापीठाचा वटवृक्ष आणि क्रांतीवीर संकुल यांच्यातील ऋणानुबंध कायम राहावेत,अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

IMG-20260924-WA0015


रोपण महोत्सवी वर्ष पूर्ण केलेल्या संकुलात आज १४ ते १५ गावांतील २,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा गौरव करण्यात आला.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये स्नेहा पांडुरंग काटकर,प्रांजल उज्ज्वलकुमार काळे, अनुजा मंगरुळे, संस्कृती जयंत ढाले, आदित्य बाबुराव घाडगे आणि नदीम अखिल काझी यांचा समावेश होता.

कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *