Thursday, October 29

डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्याच्या गच्चीवर पहाटे तरुण;हातोडा,दोरी, हातमोजे सापडल्याची माहिती

उपलब्ध सीसीटीव्ही चित्रणानुसार, संबंधित तरुण पहाटे सुमारे तीन वाजता गच्चीवर गेल्याचे आणि सकाळपर्यंत तेथेच असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.त्याच्याकडे हातोडा,पक्कड,दोरी आणि हातमोजे आढळल्याची माहितीही त्यांनी दिली.

IMG_20260918_195219

संबंधित तरुण विद्यार्थी असल्याचे कागदपत्रे पोलिसांच्या तपासात दिसत असले तरी कोणाच्याही घरात हत्यारांसह एखादी व्यक्ती एवढा वेळ का थांबते यामागील हेतू तपासणे आवश्यक आहे,असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

या घटनेमागे नेमका कोणता उद्देश होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.चोरीचा हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी संबंधित तरुणाचा नेमका हेतू तपासातूनच स्पष्ट होईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.या घटनेमागे राजकीय हेतू आहे का, याबाबतही तपासातूनच सत्य समोर येईल, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान संबंधित तरुणाला सोडण्यासाठी काही जणांनी पोलिसांना फोन केल्याची चर्चा आपल्या कानावर आल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.मात्र पोलिस आयुक्तांनी कोणत्याही फोनचा तपासावर परिणाम होणार नाही, असे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.गोऱ्हे यांनी यापूर्वी आपल्या घरावर दगडफेक झाल्याचे तसेच धमक्यांचे प्रकार घडल्याचा उल्लेख केला.त्यामुळे निवासस्थानाच्या सुरक्षेचे नव्याने मूल्यांकन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. परिसरातील अंधार आणि बंद असलेल्या रस्त्यावरील दिव्यांकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

या घटनेनंतर निवासस्थानाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिस तपासात संबंधित तरुणाच्या प्रवेशाचा मार्ग, त्याच्या कडील साहित्य,पाणीपुरवठा खंडित करण्यामागील कारण व त्याच्या उपस्थितीमागील नेमका हेतू याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *