Wednesday, October 28

Tag: #SatyajeetTambe

निसर्गाची कत्तल चालते, पण चार छत्र्यांसाठी रेल्वेच अडते! विकासाचा हा कुठला न्याय ?– आमदार सत्यजीत तांबे
Maharashtra, Politics

निसर्गाची कत्तल चालते, पण चार छत्र्यांसाठी रेल्वेच अडते! विकासाचा हा कुठला न्याय ?– आमदार सत्यजीत तांबे

भिमाशंकरपासून नाशिकपर्यंत वृक्षतोडीवरून संताप; पुणे– नाशिक सरळ रेल्वेमार्गाच्या अडथळ्यांवर तांबे यांचा सवाल भिमाशंकर आणि नाशिकमधील वृक्षतोडीवरून आमदार सत्यजीत तांबे आक्रमक. चार छत्र्यांसाठी पुणे–नाशिक सरळ रेल्वेमार्ग अडत असल्याच्या मुद्द्यावरून विकासाच्या प्राधान्यक्रमांवर सवाल. नाशिक | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क : विकासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल सुरू असताना, दुसरीकडे अवघ्या चार छत्र्यांच्या मुद्द्यावरून पुणे–नाशिक सरळ रेल्वेमार्गा सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडवला जात असेल, तर हा विकासाचा नेमका कोणता न्याय? असा संतप्त सवाल आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला आहे.भिमाशंकरपासून नाशिक पर्यंत सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि विकासाच्या प्राधान्यक्रमां बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. भिमाशंकरसारख्या पवित्र आणि निसर्गसमृद्ध परिसरात विविध प्रक...
धुळ्यात Coffee with Satyajeet उपक्रमातून Gen Z आणि तरुण- तरुणींशी साधला मनमोकळा संवाद
Maharashtra, Politics

धुळ्यात Coffee with Satyajeet उपक्रमातून Gen Z आणि तरुण- तरुणींशी साधला मनमोकळा संवाद

तरुणांच्या कल्पनांना कृतीची जोड देण्यासाठी Younnovation Centre ठरणार हक्काचं व्यासपीठ – आमदार सत्यजीत तांबे तरुणांच्या कल्पनांना मिळणार कृतीची जोड! पाच जिल्ह्यांत Younnovation Centre उभारणार; सत्यजीत तांबे यांची धुळ्यात घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘Coffee with Satyajeet’ उपक्रमातून धुळ्यात Gen Z आणि तरुणांशी संवाद. नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये Younnovation Centre च्या माध्यमातून शिक्षण, उद्योजकता, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. धुळे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ ऑक्टोबर २०२६ : जळगावनंतर आज धुळे येथे Coffee with Satyajeet या संवाद मालिकेच्या माध्यमातून आमदार सत्यजीत तांबे यांनी विविध क्षेत्रांतील विद्यार्थी, Gen Z आणि तरुण-तरुणींशी मनमोकळा संवाद साधला.शिक्षण, रोजगार, व्यवसाय,शेती आणि तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर झालेल्या य...
संगमनेर एमआयडीसीसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा
Maharashtra, mumbai

संगमनेर एमआयडीसीसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा

संगमनेरच्या साकुर-बोटा-पठार भागात एमआयडीसीसाठी हालचालींना वेग; सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याची आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी संगमनेर तालुक्यातील साकुर- बोटा -पठार भागात प्रस्तावित एमआयडीसीचे सर्वेक्षण लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी,अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.सहकारी औद्योगिक वसाहतीतील प्रश्न सोडविण्यासाठीही उद्योग विभागा कडे पाठपुरावा. संगमनेर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० सप्टेंबर २०२६ : संगमनेर तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देऊन रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी एमआयडीसी प्रशासन आणि उद्योग विभागाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. साकुर -बोटा-पठार भागातील प्रस्तावित एमआयडीसीसाठीचे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे एमआयडीसी...
महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून सावरण्याची शक्ती दे,श्री इच्छापूर्ती गणरायाच्या चरणी आमदार सत्यजीत तांबे यांची प्रार्थना
Maharashtra

महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून सावरण्याची शक्ती दे,श्री इच्छापूर्ती गणरायाच्या चरणी आमदार सत्यजीत तांबे यांची प्रार्थना

संगमनेरच्या १३१ वर्षांच्या वैभवशाली परंपरेचा मानाचा श्री इच्छापूर्ती गणेश विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात संगमनेरच्या १३१ वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेतील मानाच्या श्री इच्छापूर्ती गणेशाची विसर्जन मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली. आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून सावरण्याची शक्ती मिळावी, अशी गणरायाकडे प्रार्थना केली. पारंपरिक वाद्यांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि पर्यावरणपूरक विसर्जनाने सोहळ्याला विशेष रंगत आली. संगमनेर, दि. २५ सप्टेंबर २०२६ : संगमनेर शहरातील १३१ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मानाच्या श्री इच्छापूर्ती गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला आज भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील रंगार गल्ली येथील सोमेश्वर मित्र मंडळाच्या या ऐतिहासिक गणेशोत्सवाला यंदाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. Lorem Ipsum has been...