Wednesday, October 28

आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश; प्रथमेश पाटीलला सुवर्णपदक, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीसाठी निवड

या स्पर्धेत 65 ते 70 किलो वजनी गटात प्रथमेश अर्जुन पाटील याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.त्याच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धे साठी निवड झाली आहे.त्यामुळे आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथमेश महाविद्यालय तसेच सोलापूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

याशिवाय 47 ते 50 किलो वजनी गटात अविनाश खंडाळे याने रौप्यपदक मिळविले.50 ते 55 किलो वजनी गटात प्रेम कांबळे याने कास्यपदक पटकावले तर 55 ते 60 किलो वजनी गटात संकेत मोरे आणि सुशांत कुलकर्णी यांनी प्रत्येकी कास्यपदक मिळवत आपल्या खेळातील कौशल्याची छाप पाडली.

या सर्व विद्यार्थी खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि उत्कृष्ट तयारीच्या जोरावर ही कामगिरी केली. त्यांच्या यशामुळे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे नाव विद्यापीठ स्तरावरील क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल झाले आहे.

खेळाडूंच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.टी. जाधव तसेच सर्व विभागांचे उपप्राचार्य, विभागप्रमुख आणि सेवकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.

विद्यार्थी खेळाडूंना जिमखाना विभागप्रमुख प्रा.अनिल परमार,प्रा. डॉ. उमेश साळुंखे,प्रा.विठ्ठल फुले आणि प्रा.मनोज खपाले यांचे मार्गदर्शन लाभले.प्रशिक्षक व मार्गदर्शकांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळे खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव करून स्पर्धेसाठी प्रभावी तयारी केली आणि त्याचे रूपांतर पदकांच्या रूपात केले.

प्रथमेश पाटीलची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी झालेली निवड हे या यशाचे विशेष आकर्षण ठरले आहे.त्याच्या आगामी राष्ट्रीय स्तरा वरील कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले असून, महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थी खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *