Thursday, October 29

मुळेगाव तांड्यावर अवैध हातभट्टीवर पोलिसांचा छापा 5 लाख 41 हजारांचा मुद्देमाल नष्ट,4 सराईतांवर गुन्हे

IMG_20261008_064429

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल वी.कुलकर्णी यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने दि.७ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई केली.

कारवाईदरम्यान अवैध हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, चुल, लोखंडी बॅरल, प्लास्टिक बॅरलमध्ये भरलेले गूळ- मिश्रित रसायन तसेच हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक अन्य साहित्य असा एकूण अंदाजे ५ लाख ४१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

विशेष म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अवैध हातभट्टी निर्मितीचे ठिकाण पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने हातभट्टीचे अड्डे आणि साहित्य नष्ट करण्यात आले.

अवैध हातभट्टी तयार करण्याच्या उद्देशाने साहित्य बाळगल्याप्रकरणी चार सराईत हातभट्टी व्यावसायिकां विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालया मार्फतही पुढील कारवाई सुरू आहे.

अवैध हातभट्टी व्यवसाय,बनावट दारूची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.कोणालाही पाठीशी घातले जाणार नसून संबंधितां विरुद्ध हद्दपार,एमपीडीए यासारख्या प्रभावी प्रतिबंधात्मक कारवायाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

IMG_20261008_064533

ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल वी. कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून निरीक्षक जगन्नाथ पाटील, निरीक्षक अविनाश घाटगे, प्रभारी निरीक्षक शिवकुमार कांबळे तसेच भरारी पथक क्रमांक १ आणि इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड,सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलीस हवालदार देवकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पुरुष व महिला अंमलदार सहभागी झाले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून उपनिरीक्षक राम निंबाळकर, समाधान शेळके, सुखदेव सिद, अंजली सरवदे, धनाजी पवार, सचिन शिंदे, विकास थोरात तसेच महिला व पुरुष जवानांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *