‘पार्सल थांबले’ असा मेसेज आला? सावधान! पत्ता अपडेटच्या बहाण्याने सायबर ठगांचा बँक खात्यावर डोळा
इंडिया पोस्ट आणि कुरिअर कंपन्यांच्या नावाने SMS-WhatsAppवर बनावट संदेश; ₹10 ते ₹50 च्या शुल्काच्या आमिषातून कार्ड, नेट बँकिंग आणि UPIची गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न जयपूर | SDNA मोबाईलवर अचानक ‘तुमचे पार्सल चुकीच्या पत्त्यामुळे होल्डवर आहे’, ‘पत्ता अपडेट केला नाही तर पार्सल परत जाईल’ किंवा ‘डिलिव्हरी थांबवण्यात आली असून तत्काळ लिंकवर क्लिक करा’ असा संदेश आला, तर घाईघाईने त्यावर विश्वास ठेवू नका. इंडिया पोस्ट, स्पीड पोस्ट तसेच विविध नामांकित कुरिअर कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून सायबर ठग नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा इशारा राजस्थान पोलिसांच्या सायबर क्राइम शाखा R4Cने दिला आहे. बनावट SMS, WhatsApp संदेश, ई-मेल आणि फोन कॉलच्या माध्यमातून नागरिकांना विश्वासात घेऊन फिशिंग लिंक उघडण्यास किंवा संशयास्पद मोबाइल अॅप डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे....

