शुभमन गिलचा विक्रमी डबल धमाका; 117 चेंडूत द्विशतक, धावांचा पाठलाग करताना नवा इतिहास
वेस्ट इंडिजविरुद्ध गुवाहाटीत तुफानी फलंदाजी; वनडेतील सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम नावावर गुवाहाटी। भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिलने गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर आपल्या फलंदाजीची ऐतिहासिक झलक दाखवत विक्रमांची अक्षरशः रांग लावली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात गिलने अवघ्या 117 चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केले. या कामगिरीसह तो वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक करणारा फलंदाज ठरला आहे. गिलचे हे वनडे कारकिर्दीतील दुसरे द्विशतक आहे. यापूर्वी त्याने 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 208 धावांची संस्मरणीय खेळी केली होती. दोन वनडे द्विशतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता रोहित शर्मानंतर गिलचे नाव दाखल झाले आहे. धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजाचा पहिलाच डबल सेंच्युरी वेस्ट इंडिजने भारतासमोर तब्बल 406 धावांचे आव्हान ठेवले होते. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा...

