पंढरपुरात ललित पंचमीला श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला अलंकारांचा साज; रुक्मिणी मातेला वनदेवी माता पोशाख
पंढरपूरमध्ये नवरात्र महोत्सवाच्या ललित पंचमीला श्री विठ्ठल, रुक्मिणी माता आणि परिवार देवतांना पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले. रुक्मिणी मातेला वनदेवी माता पोशाख;मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली माहिती. ललित पंचमीला विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मनमोहक रूप! रुक्मिणी मातेला वनदेवी पोशाख, सोन्या-मोत्यांच्या अलंकारांनी सजले देव पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ ऑक्टोबर : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. घटस्थापनेपासून सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात ललित पंचमीच्या पाचव्या माळेनिमित्त श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांना पारंपरिक पोशाखासह विविध अलंकार परिधान करण्यात आले. यावेळी रुक्मिणी मातेला विशेष वनदेवी माता पोशाख परिधान करण्यात आला अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यां...

