चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करून सोमवार,दि.१२ ऑक्टोबर पर्यंत चारा उपलब्ध करून द्या :डॉ.नीलम गोऱ्हे
२५ सप्टेंबरच्या शासन निर्णयानंतरही गंभीर दुष्काळग्रस्त भागात पाहणी झालेली दिसत नसल्याबद्दल व्यक्त केला खेद करडखेल,दिग्रज व सताळा ता. उदगीर जि.लातूर येथे थेट बांधावर जाऊन डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून दुष्काळाची पाहणी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात दुष्काळाची पाहणी करत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी चाऱ्याची गरज असलेल्या गावांमध्ये सोमवार, १२ ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. शेतकरी मदत, पाणीटंचाई आणि रोजगाराच्या प्रश्नांवरही पाठपुरावा करणार. उदगीर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.८ ऑक्टोबर : चाऱ्याची आवश्यकता असलेल्या गावांची तातडीने पाहणी करून गरजू शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गावातच सोमवार, दि. १२ ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा,अशा सूचना विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिल्या. दुष्काळी उपाययोजनांबाबत २५ सप्टेंबर रोजी शासन निर्ण...

