Thursday, October 29

Tag: #शेतकरी

भीमा नदीवरील ४ बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर होणार; सर्वेक्षणासाठी ७२ लाख मंजूर, आ. समाधान आवताडे यांची माहिती
Maharashtra, Politics

भीमा नदीवरील ४ बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर होणार; सर्वेक्षणासाठी ७२ लाख मंजूर, आ. समाधान आवताडे यांची माहिती

उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भीमा नदीवर बॅरेजचा मार्ग मोकळा; चार बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणासाठी ७२ लाख मंजूर पावसाळ्यात पूर,उन्हाळ्यात पाण्याची वणवण,भीमा नदीवरील चार बंधाऱ्यांसाठी ७२ लाख मंजूर; शेतकऱ्यांना काय फायदा होणार ? पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील भीमा नदीवरील मुंढेवाडी, बठाण, माचणूर आणि अरळी येथील को.प. बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वेक्षण व अन्वेषणाकरिता ७२ लाख रुपये मंजूर. आमदार समाधान आवताडे यांचा पुढाकार पंढरपूर-मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क : पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी भीमा नदी उन्हाळ्यात कोरडी पडते आणि पाण्याच्या प्रतीक्षेत नदीकाठच्या शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो. हे चित्र बदलण्यासाठी भीमा नदी वरील को.प.बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघा तील च...
शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली केल्यास फौजदारी गुन्हा; मुख्यमंत्री फडणवीसांचा मायक्रोफायनान्स कंपन्यांना इशारा
Maharashtra, mumbai

शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली केल्यास फौजदारी गुन्हा; मुख्यमंत्री फडणवीसांचा मायक्रोफायनान्स कंपन्यांना इशारा

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी दमदाटी करून कर्जवसुली केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि कर्जवसुलीच्या त्रासापासून संरक्षण देण्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजारांची अग्रीम मदत राज्यातील दुष्काळग्रस्त सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने निधीसह मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी सर्व पात्र श...
पहिल्या टप्प्यातील १११ कोटी, दुसऱ्या टप्प्यातील ७८ कोटी ४३ लाखांच्या कामांचा आढावा; तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही वेग देण्याच्या सूचना
Maharashtra, Politics

पहिल्या टप्प्यातील १११ कोटी, दुसऱ्या टप्प्यातील ७८ कोटी ४३ लाखांच्या कामांचा आढावा; तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही वेग देण्याच्या सूचना

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला गती द्या; मार्च २०२७ पूर्वी पाणी सुरू करण्याचे आमदार आवताडे यांचे निर्देश पहिल्या टप्प्यातील १११ कोटी, दुसऱ्या टप्प्यातील ७८ कोटी ४३ लाखांच्या कामांचा आढावा; तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही वेग देण्याच्या सूचना मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज: मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती देण्याचे निर्देश आमदार समाधान आवताडे यांनी दिले आहेत.योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत त्यांनी कामातील अडथळ्यांचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यातील पंप हाऊस, मुख्य उर्ध्वगामी नलिका आणि वितरण व्यवस्थेची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. दुसऱ्या टप्प्यातील कामांचे नियोजन करून मार्च २०२७ पूर्वी पाणी सोडण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत,अशा स...
पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ निर्माण झाला आहे ; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या.भगीरथ भालके यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन
Maharashtra, Politics

पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ निर्माण झाला आहे ; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या.भगीरथ भालके यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन

पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर-मंगळवेढ्यात दुष्काळी संकट; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या – भगीरथ भालके पंढरपूर-मंगळवेढा परिसरात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत, चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी भगीरथ भालके यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ : ऐन पावसाळ्याच्या दिवसांत पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेचे नेते भगीरथ भालके यांनी आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे समक्ष भेटून निवेदनाद्...
सोलापूर जिल्ह्यात चारा बंदी आदेश लागू;बाहेर चारा नेल्यास थेट फौजदारी कारवाई-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांचा आदेश
Maharashtra

सोलापूर जिल्ह्यात चारा बंदी आदेश लागू;बाहेर चारा नेल्यास थेट फौजदारी कारवाई-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांचा आदेश

कमी पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय; पशुधनासाठी चारा राखण्यावर भर सोलापूर जिल्ह्यात चारा बंदी! बाहेर चारा नेल्यास थेट फौजदारी कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर आदेश,कमी पावसाचा मोठा परिणाम; सोलापूरचा चारा बाहेर नेण्यास बंदी, पशुधनासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा जिल्ह्याबाहेर व परराज्यात नेण्यास बंदी. जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा. सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज: पावसातील खंड आणि कमी पर्जन्यमानामुळे सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी उपलब्ध असलेला चारा जिल्ह्याबाहेर जाऊ नये आणि स्थानिक पशुपालकांना चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. सोलापूरचे जिल्हाधिका...
२६५ तालुक्यांत दुष्काळाची घोषणा; शेतकऱ्यांना कर्ज वसुली स्थगिती,वीजबिलात सवलत, पंचनामे तातडीने – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Maharashtra, mumbai

२६५ तालुक्यांत दुष्काळाची घोषणा; शेतकऱ्यांना कर्ज वसुली स्थगिती,वीजबिलात सवलत, पंचनामे तातडीने – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना जमीन महसूल सूट, पीक कर्ज पुनर्गठन, वीजबिल सवलत आणि कर्जवसुलीस स्थगिती. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश. मुंबई,दि.२६ सप्टेंबर २०२६ : संकटाच्या प्रत्येक काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. आताही दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनाच आमचे संपूर्ण प्राधान्य राहील, अशी ग्वाही देतानाच आम्ही दिलेला शब्द पाळणारे असून २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून त्यासाठीच्या उपाययोजना आणि विशेष सवलती जाहीर केल्याचे सांगत शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती देतांना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुख्यमत्र्यांस...
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज-आमदार सत्यजीत तांबे
Breaking news

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज-आमदार सत्यजीत तांबे

पावसाअभावी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजनांना गती देण्याची मागणी दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मदत शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा; सत्यजीत तांबे यांचा शासनाला आग्रह महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत, पाणी, चारा, वीज आणि आवश्यक सवलतींचा लाभ वेळेत मिळावा,अशी मागणी केली. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा-पाणी, शेतीसाठी पाणी आणि वीजपुरवठ्यासह विविध उपाययोजनांना गती देण्याची गरज असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. मुंबई, दि. २६ सप्टेंबर २०२६ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची दखल घेत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.या निर्णयामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असून दुष्काळी भागांसाठी जाही...