Thursday, October 29

Tag: #Solapur

सोलापूर जिल्ह्यात चारा बंदी आदेश लागू;बाहेर चारा नेल्यास थेट फौजदारी कारवाई-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांचा आदेश
Maharashtra

सोलापूर जिल्ह्यात चारा बंदी आदेश लागू;बाहेर चारा नेल्यास थेट फौजदारी कारवाई-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांचा आदेश

कमी पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय; पशुधनासाठी चारा राखण्यावर भर सोलापूर जिल्ह्यात चारा बंदी! बाहेर चारा नेल्यास थेट फौजदारी कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर आदेश,कमी पावसाचा मोठा परिणाम; सोलापूरचा चारा बाहेर नेण्यास बंदी, पशुधनासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा जिल्ह्याबाहेर व परराज्यात नेण्यास बंदी. जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा. सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज: पावसातील खंड आणि कमी पर्जन्यमानामुळे सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी उपलब्ध असलेला चारा जिल्ह्याबाहेर जाऊ नये आणि स्थानिक पशुपालकांना चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. सोलापूरचे जिल्हाधिका...
अक्कलकोटमध्ये ऊसाच्या शेतात गांजाची शेती! २४० झाडे जप्त, किंमत तब्बल १ कोटी ५ लाख
Crime, Police

अक्कलकोटमध्ये ऊसाच्या शेतात गांजाची शेती! २४० झाडे जप्त, किंमत तब्बल १ कोटी ५ लाख

सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई; आळगी येथील ऊसाच्या शेतातून २११ किलो गांजा जप्त,६० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा अक्कलकोटच्या आळगी येथे ऊसाच्या शेतातून २११ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त. २४० झाडांची लागवड उघड; मुद्देमालाची किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये. अक्कलकोट|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ सप्टेंबर २०२६ : सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मौजे आळगी, ता. अक्कलकोट येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची २४० झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई २८ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आली. गोपनीय माहितीवरून पोलिसांची धडक कारवाई सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार...
उजनीच्या पाण्यात मँगनीज अधिक ? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल; वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स
Maharashtra

उजनीच्या पाण्यात मँगनीज अधिक ? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल; वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स

उजनी प्रदूषण प्रकरणी NHRC चा दणका! MPCB अध्यक्ष आणि आरोग्य सचिवांना समन्स; १६ ऑक्टोबरपर्यंत अहवालाचे आदेश उजनीच्या पाण्यात मँगनीज अधिक ? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल; वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स उजनी प्रदूषण प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि आरोग्य सचिवांना समन्स बजावले. १६ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश ८ महिन्यांत तीन स्मरणपत्रे देऊनही अहवाल नाही; २३ ऑक्टोबरला आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज,२४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. या प्रदूषणामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य परिणाम होत असल्याच्या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने NHRC गंभीर दखल घेतली आहे. संबंधित चौकशी अहवाल वारंवार...
सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; चेन स्नॅचिंग सह जनावर चोरीचे गुन्हे उघड,मुद्देमाल जप्त
Crime, Maharashtra, Police

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; चेन स्नॅचिंग सह जनावर चोरीचे गुन्हे उघड,मुद्देमाल जप्त

अकलूज | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० सप्टेंबर २०२६ : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चैन स्नॅचिंग आणि जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास लवंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे फिर्यादीची आई व आजी झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी व सोन्याचे कर्णफुले चोरून नेली होती. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९७/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ३० मे २०२६ रोजी रात्री ११.३० ते ३१ मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान गणेशनगर, ता. माळशिरस येथील घरासमोरून चार शेळ्या आणि पाच बोकडे चो...
शिक्षकांच्या प्रश्नांवर डॉ. रोंगे यांचा थेट संवाद; पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत भेटीगाठींचा धडाका
Maharashtra

शिक्षकांच्या प्रश्नांवर डॉ. रोंगे यांचा थेट संवाद; पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत भेटीगाठींचा धडाका

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ : डॉ. बी. पी. रोंगे यांच्या शिक्षक भेटींना प्रतिसाद; टीईटी, जुनी पेन्शनसह प्रश्नांवर भर पाच जिल्ह्यांत शिक्षकांशी थेट संवाद; डॉ. रोंगे यांनी जाणून घेतल्या शिक्षण क्षेत्रातील समस्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर डॉ.बी.पी.रोंगे यांच्या पाचही जिल्ह्यांतील शिक्षक भेटींना प्रतिसाद. टीईटी, जुनी पेन्शन व सेवा विषयक प्रश्नांवर भूमिका. कुर्डुवाडी | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ सप्टेंबर २०२६ : राज्यातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात राजकीय हालचालींना वेग आला आहे.पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या संदर्भात गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांनी गेल्या वर्षभरापासून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेतर...
सोलापुरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक;सोन्याचे दागिने, रोकड,मोटारसायकल जप्त
Crime, Maharashtra, Police

सोलापुरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक;सोन्याचे दागिने, रोकड,मोटारसायकल जप्त

सोलापूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी व चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक; सोन्याचे दागिने, रोकड, साडी आणि मोटारसायकलसह ₹७८ हजारांचा मुद्देमाल जप्त. सोलापुरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक; सोन्याचे दागिने,रोकड आणि मोटारसायकल जप्त CCTV फुटेजने उलगडला घरफोडीचा तपास; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात,७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज : घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांतील पाहिजे असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.नितीन बाबू भोसले आणि कमलाकर यशवंत पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, साड्या आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि.२४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० ते २५ ऑगस्ट रोजी सकाळी ७...
सांगोला तालुक्यात बेकायदेशीर जुगार अड्ड्या वर पोलिसांचा मोठा छापा; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Crime, Maharashtra, Police

सांगोला तालुक्यात बेकायदेशीर जुगार अड्ड्या वर पोलिसांचा मोठा छापा; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगोला तालुक्यात बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त सोनंदमध्ये जुगार अड्ड्यावर धडक कारवाई;२१ आरोपींवर गुन्हा, लाखोंचा मुद्देमाल जप्त सांगोला |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दी तील मौजे सोनंद,ता.सांगोला येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली. १७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत जुगाराचे साहित्य,रोकड, मोबाईल फोन तसेच दुचाकी व चारचाकी वाहने असा एकूण ३६ लाख १२ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत एकूण २१ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील कलम १२(अ) अन्वये ही कारवाई करण्यात आली. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्ण...