Wednesday, October 28

सांगोला तालुक्यात बेकायदेशीर जुगार अड्ड्या वर पोलिसांचा मोठा छापा; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत एकूण २१ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील कलम १२(अ) अन्वये ही कारवाई करण्यात आली.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली तसेच पंढरपूरच्या अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनंद येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला.

IMG_20260918_154659

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाला मध्ये जुगाराचे साहित्य,रोख रक्कम, मोबाईल फोन,दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर कृत्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे,असे आवाहनही करण्यात आले आहे.

सांगोला तालुक्यातील सोनंद येथे बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. २१ आरोपींवर गुन्हा दाखल; ३६ लाख १२ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *