Thursday, October 29

West Zone States

चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करून सोमवार,दि.१२ ऑक्टोबर पर्यंत चारा उपलब्ध करून द्या :डॉ.नीलम गोऱ्हे
Maharashtra, mumbai

चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करून सोमवार,दि.१२ ऑक्टोबर पर्यंत चारा उपलब्ध करून द्या :डॉ.नीलम गोऱ्हे

२५ सप्टेंबरच्या शासन निर्णयानंतरही गंभीर दुष्काळग्रस्त भागात पाहणी झालेली दिसत नसल्याबद्दल व्यक्त केला खेद करडखेल,दिग्रज व सताळा ता. उदगीर जि.लातूर येथे थेट बांधावर जाऊन डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून दुष्काळाची पाहणी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात दुष्काळाची पाहणी करत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी चाऱ्याची गरज असलेल्या गावांमध्ये सोमवार, १२ ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. शेतकरी मदत, पाणीटंचाई आणि रोजगाराच्या प्रश्नांवरही पाठपुरावा करणार. उदगीर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.८ ऑक्टोबर : चाऱ्याची आवश्यकता असलेल्या गावांची तातडीने पाहणी करून गरजू शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गावातच सोमवार, दि. १२ ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा,अशा सूचना विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिल्या. दुष्काळी उपाययोजनांबाबत २५ सप्टेंबर रोजी शासन निर्ण...
महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाला मोठे बळ!१० नवीन शासकीय महाविद्यालयांना मान्यता;५ कॉलेजची प्रवेश क्षमता दुप्पट
Maharashtra, mumbai

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाला मोठे बळ!१० नवीन शासकीय महाविद्यालयांना मान्यता;५ कॉलेजची प्रवेश क्षमता दुप्पट

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ८ जी.एन.एम. महाविद्यालयांचे बी.एस्सी.नर्सिंग महाविद्यालयांत श्रेणीवर्धन, ५ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता दुप्पट आणि १० नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाचा विस्तार;१० नवीन शासकीय महाविद्यालयांना मान्यता,२३ महाविद्यालयांची क्षमता वाढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महत्त्वपूर्ण निर्णय; नर्सिंगच्या प्रवेश क्षमता वाढीसह ५५८.७१ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता मुंबई,दि.८ ऑक्टोबर २०२६ : राज्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षित परिचारिकांची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने नर्सिंग शिक्षणाचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस २ कोटींची मदत; १४ नोव्हेंबरपासून २४ तास दर्शन
Maharashtra

दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस २ कोटींची मदत; १४ नोव्हेंबरपासून २४ तास दर्शन

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.८ ऑक्टोबर २०२६ : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन पंढरपूर येथील श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीने सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवतावादी दृष्टिकोनातून मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाची पूर्वपरवानगी घेऊन ही मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय,आगामी कार्तिकी यात्रेनिमित्त १४ नोव्हेंबरपासून भाविकांसाठी २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेतही भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. मंदिर समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीची सभा ८ ऑक्टोबर रोजी...
धोंडू बाबा मनोहर उर्फ मामा भोसले आणि दत्तकला चे अध्यक्ष रामदास झोळ टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
Crime, Maharashtra, Police

धोंडू बाबा मनोहर उर्फ मामा भोसले आणि दत्तकला चे अध्यक्ष रामदास झोळ टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

धोंडू बाबा मनोहर उर्फ मामा भोसले आणि दत्तकला चे अध्यक्ष रामदास झोळ यांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज : करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील भोंदू बाबा मनोहर उर्फ मामा भोसले आणि दौंड येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांच्या टोळीविरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का - MCOCA अंतर्गत कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि काळा जादू प्रतिबंधक गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व काळा जादू प्रतिबंध व निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून सुरू असताना, मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले आणि त्याचा सहकारी विशाल...
सोलापूर: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या १२ मंडळांना जिल्हास्तरीय गणराया अवॉर्ड;पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव
Maharashtra

सोलापूर: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या १२ मंडळांना जिल्हास्तरीय गणराया अवॉर्ड;पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव

सोलापूर: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या १२ मंडळांना 'जिल्हास्तरीय गणराया अवॉर्ड'; पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव सोलापूर ग्रामीण पोलिसांतर्फे सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या १२ गणेश मंडळांना जिल्हास्तरीय गणराया अवॉर्ड २०२६ प्रदान; सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज :सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी जिल्हास्तरीय शांतता समिती तसेच गणेश मंडळांच्या बैठका घेऊन No DJ, No Dolby, No Laser Light या संकल्पनेचा स्वीकार करण्याचे आवाहन केले होते. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळांनी पारंपरिक मिरवणुकां ऐवज...
नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने संवेदनशील कलावंत गमावला-आमदार सत्यजीत तांबे
Maharashtra, mumbai

नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने संवेदनशील कलावंत गमावला-आमदार सत्यजीत तांबे

नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने संवेदनशील कलावंत गमावला; आमदार सत्यजीत तांबे यांची भावपूर्ण श्रद्धांजली ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने संवेदनशील आणि समाजभान जपणारा कलावंत गमावला, अशा शब्दांत आमदार सत्यजीत तांबे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.८ ऑक्टोबर २०२६ : ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राचीही मोठी हानी झाली आहे. आपल्या रोखठोक स्वभावाने,प्रभावी अभिनयाने आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांनी त्यांनी असंख्य प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप उमटवली. महाराष्ट्राने एक सच्चा, संवेदनशील आणि समाजाशी नाळ जोडलेला कलाकार गमावला आहे, अशा शब्दांत आमदार सत्यजीत तांबे यांनी नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मराठी आणि हिंदी चित्र...
सामाजिक बांधिलकी जोपासणारा सिनेविश्वातील क्रांतिवीर हरपला; नाना पाटेकर यांच्या निधनाने मोठी पोकळी –केंद्रीय मंत्री रामदास आठवले
Bollywood, Maharashtra, mumbai

सामाजिक बांधिलकी जोपासणारा सिनेविश्वातील क्रांतिवीर हरपला; नाना पाटेकर यांच्या निधनाने मोठी पोकळी –केंद्रीय मंत्री रामदास आठवले

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली. सामाजिक बांधिलकी जपणारा सिनेविश्वातील क्रांतिवीर हरपल्याची भावना आठवले यांनी व्यक्त केली. नाना पाटेकर यांच्या निधनाने सामाजिक बांधिलकी जपणारा क्रांतिवीर हरपला; रामदास आठवले यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.८ ऑक्टोबर : ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने सामाजिक बांधिलकी जोपासणारे सिनेविश्वातील क्रांतिवीर व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकर हे आदर्श नटसम्राट आणि उत्तुंग कलावंत होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या कला आणि सामाजिक क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुक...
अपयशावर मात करत सरकोलीच्या तरुणाने उभारले मोठे उद्योग साम्राज्य;निखिल भोसले यांचा सकाळ कडून सन्मान
Maharashtra

अपयशावर मात करत सरकोलीच्या तरुणाने उभारले मोठे उद्योग साम्राज्य;निखिल भोसले यांचा सकाळ कडून सन्मान

अपयशावर मात करत सरकोलीच्या तरुणाने उभारले मोठे उद्योग साम्राज्य;निखिल भोसले यांचा सकाळ कडून सन्मान पंढरपूरच्या सरकोली गावचे निखिल भोसले यांनी अपयशातून भरारी घेत उद्योगात यश मिळवले. 'सकाळ' माध्यम समूहाने त्यांचा विशेष गौरव केला असून जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास. पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावातून आलेल्या निखिल भोसले यांनी उद्योजकता आणि समाजसेवेच्या बळावर उद्योग जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विशेष सरकारी वकील आणि खासदार ॲड.उज्ज्वल निकम आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ‘मराठा उद्योजकांची यशोगाथा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करून भोसले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ...
स्वच्छता अभियानातून 18 टन कचरा संकलित, अभियानात सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक व न.पा कर्मचाऱ्यांचा सहभाग
Maharashtra

स्वच्छता अभियानातून 18 टन कचरा संकलित, अभियानात सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक व न.पा कर्मचाऱ्यांचा सहभाग

चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियानात 18 टन कचरा संकलित;स्वच्छता हीच विठ्ठल सेवा चा संदेश पंढरपूरच्या चंद्रभागा वाळवंटात विशेष स्वच्छता अभियान; सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून 18 टन कचरा संकलित. दर बुधवारी श्रमदान अभियान राबविण्याचा निर्णय पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ७ ऑक्टोबर २०२६ :-पंढरपूर शहरातील चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ, सुंदर व निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर यांच्या पुढाकाराने आज चंद्रभागा वाळवंट परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानास विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांनी उत्स्फूर्तपणे संख्येने सहभाग नोंदविला. या स्वच्छता अभियानातून तब्बल 18 टन कचरा संकलित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. सदर स्वच्छत...
नवरात्रौत्सवासाठी पंढरपूर पोलीस अलर्ट! मंदिर परिसरात मॉकड्रिल; शीघ्रकृती दल, दंगा नियंत्रण आणि बॉम्बशोधक पथकाची रंगीत तालीम
Maharashtra, Police

नवरात्रौत्सवासाठी पंढरपूर पोलीस अलर्ट! मंदिर परिसरात मॉकड्रिल; शीघ्रकृती दल, दंगा नियंत्रण आणि बॉम्बशोधक पथकाची रंगीत तालीम

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांचे मॉकड्रिल; आपत्कालीन परिस्थितीसाठी शीघ्रकृती दल सज्ज पंढरपुरात शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे मॉकड्रिल; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात शीघ्रकृती, दंगा नियंत्रण व बॉम्बशोधक पथकाचा सहभाग. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ७ ऑक्टोबर २०२६ : आगामी शारदीय नवरात्रौत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पंढरपूर शहर पोलीस दल सतर्क झाले आहे. कोणत्याही आपत्कालीन किंवा अनुचित प्रसंगी पोलीस दल घटनास्थळी किती वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचते, याची चाचपणी करण्यासाठी बुधवारी (दि. ७) श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात मॉकड्रिल घेण्यात आली. नवरात्रौत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून या मॉकड्रिलच्या माध...