Thursday, October 29

Tag: #पंढरपूर

दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस २ कोटींची मदत; १४ नोव्हेंबरपासून २४ तास दर्शन
Maharashtra

दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस २ कोटींची मदत; १४ नोव्हेंबरपासून २४ तास दर्शन

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.८ ऑक्टोबर २०२६ : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन पंढरपूर येथील श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीने सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवतावादी दृष्टिकोनातून मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाची पूर्वपरवानगी घेऊन ही मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय,आगामी कार्तिकी यात्रेनिमित्त १४ नोव्हेंबरपासून भाविकांसाठी २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेतही भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. मंदिर समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीची सभा ८ ऑक्टोबर रोजी...
नवरात्रौत्सवासाठी पंढरपूर पोलीस अलर्ट! मंदिर परिसरात मॉकड्रिल; शीघ्रकृती दल, दंगा नियंत्रण आणि बॉम्बशोधक पथकाची रंगीत तालीम
Maharashtra, Police

नवरात्रौत्सवासाठी पंढरपूर पोलीस अलर्ट! मंदिर परिसरात मॉकड्रिल; शीघ्रकृती दल, दंगा नियंत्रण आणि बॉम्बशोधक पथकाची रंगीत तालीम

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांचे मॉकड्रिल; आपत्कालीन परिस्थितीसाठी शीघ्रकृती दल सज्ज पंढरपुरात शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे मॉकड्रिल; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात शीघ्रकृती, दंगा नियंत्रण व बॉम्बशोधक पथकाचा सहभाग. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ७ ऑक्टोबर २०२६ : आगामी शारदीय नवरात्रौत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पंढरपूर शहर पोलीस दल सतर्क झाले आहे. कोणत्याही आपत्कालीन किंवा अनुचित प्रसंगी पोलीस दल घटनास्थळी किती वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचते, याची चाचपणी करण्यासाठी बुधवारी (दि. ७) श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात मॉकड्रिल घेण्यात आली. नवरात्रौत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून या मॉकड्रिलच्या माध...
पंढरपूरला स्वतंत्र RTO कार्यालयाचा मार्ग मोकळा? आ.समाधान आवताडेंच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश
Maharashtra

पंढरपूरला स्वतंत्र RTO कार्यालयाचा मार्ग मोकळा? आ.समाधान आवताडेंच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश

पंढरपूरला स्वतंत्र RTO कार्यालयासाठी आ.समाधान आवताडेंचा पाठपुरावा; मुख्यमंत्र्यांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश पंढरपुरात स्वतंत्र RTO कार्यालय सुरू करण्यासाठी आमदार समाधान आवताडेंचा पाठपुरावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर येथे स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सुरू करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी शासना कडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालयास ‘विशेष बाब’ म्हणून मंजुरी देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत परिवहन विभागाला याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले पडण...
पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ निर्माण झाला आहे ; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या.भगीरथ भालके यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन
Maharashtra, Politics

पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ निर्माण झाला आहे ; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या.भगीरथ भालके यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन

पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर-मंगळवेढ्यात दुष्काळी संकट; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या – भगीरथ भालके पंढरपूर-मंगळवेढा परिसरात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत, चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी भगीरथ भालके यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ : ऐन पावसाळ्याच्या दिवसांत पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेचे नेते भगीरथ भालके यांनी आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे समक्ष भेटून निवेदनाद्...
आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश; प्रथमेश पाटीलला सुवर्णपदक, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीसाठी निवड
Maharashtra, Sports

आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश; प्रथमेश पाटीलला सुवर्णपदक, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीसाठी निवड

आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश; प्रथमेश पाटीलला सुवर्णपदक, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीसाठी निवड आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश प्रथमेश पाटीलचे सुवर्णपदकासह ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत आयोजित आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विविध पदकांची कमाई केली. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या स्पर्धेत 65 ते 70 किलो वजनी गटात प्रथमेश अर्जुन पाटील याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.त्याच्या ...
घरातील महिला सक्षम असेल तर कुटुंबाची प्रगती लवकर होते – श्रीकांत यादव
Maharashtra

घरातील महिला सक्षम असेल तर कुटुंबाची प्रगती लवकर होते – श्रीकांत यादव

घरातील महिला सक्षम असेल तर कुटुंबाची प्रगती लवकर होते – श्रीकांत यादव भाळवणीत गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा; विजेत्यांचा सन्मान भाळवणी येथे एलआयसी, प्रिती ऑनलाईन शॉप व तेज न्यूज आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२६ चा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. श्रीकांत यादव यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. भाळवणी | ज्ञानप्रवाह न्यूज : घराची भरभराट आणि प्रगती साधायची असेल तर घरातील महिला सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. महिला सक्षम असेल तर कुटुंबाची प्रगतीही लवकर होते,असे प्रतिपादन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी केले. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील यशश्री क्लासेस येथे एलआयसी, प्रिती ऑनलाईन शॉप व तेज न्यूज यांच्यावतीने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२६ चा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्...
पंढरपुरात स्वच्छतेची विठ्ठलवारी उपक्रम; दर बुधवारी चंद्रभागा वाळवंटात श्रमदानातून स्वच्छतेची वारी
Maharashtra

पंढरपुरात स्वच्छतेची विठ्ठलवारी उपक्रम; दर बुधवारी चंद्रभागा वाळवंटात श्रमदानातून स्वच्छतेची वारी

स्वच्छता हीच विठ्ठल सेवा’; मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या पुढाकारातून पंढरपुरात स्वच्छतेचा नवा संकल्प पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर बुधवारी सकाळी ७.३० ते ९.३० चंद्रभागा वाळवंटात ‘स्वच्छतेची विठ्ठलवारी’ अभियान; सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालयांना सहभागाचे आवाहन. विठ्ठलनगरीत भक्तीचा नवा अध्याय,दर बुधवारी स्वच्छतेची विठ्ठलवारी,चंद्रभागा वाळवंटासाठी श्रमदानाचा संकल्प पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ : विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक पंढरपुरात दाखल होतात.भक्ती,श्रद्धा आणि वारकरी परंपरेने नटलेल्या या पवित्र नगरीची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे.याच भावनेतून पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर बुधवारी स्वच्छतेची विठ्ठलवारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वच्छता हीच विठ्ठल सेवा,श्रमदाना तून ...
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या तुळशी अर्चन पूजेची २७ सप्टेंबर पासून ऑनलाइन नोंदणी
Maharashtra

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या तुळशी अर्चन पूजेची २७ सप्टेंबर पासून ऑनलाइन नोंदणी

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी तुळशी अर्चन पूजेची २७ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी; २१०० रुपये देणगी विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! ऑक्टोबरमधील तुळशी अर्चन पूजेची ऑनलाइन नोंदणी २७ सप्टेंबरपासून पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या तुळशी अर्चन पूजेची २७ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील पूजेसाठी २१०० रुपये देणगी मूल्य निश्चित करण्यात आले आहे. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ सप्टेंबर २०२६ : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची तुळशी अर्चन पूजा मंदिर समितीच्यावतीने भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील तुळशी अर्चन पूजेची ऑनलाइन नोंदणी २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली. तुळशी अर्चन पूजेसाठी २ हजार १०० रुपये देणगी मूल्...
गणेश विसर्जनासोबत निर्माल्य संकलन; पंढरपुरातील स्काऊट – गाईड विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
Maharashtra

गणेश विसर्जनासोबत निर्माल्य संकलन; पंढरपुरातील स्काऊट – गाईड विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

पर्यावरणाचे रक्षण हीच खरी गणेशभक्ती; पंढरपुरात विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम गणेश विसर्जनासोबत निर्माल्य संकलन; पंढरपुरातील स्काऊट - गाईड विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम पंढरपूर येथील श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व निर्माल्य संकलन उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर पंढरपूर यांच्यावतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पर्यावरणपूरक गणेश विसर्जन आणि निर्माल्य संकलनाचा स्तुत्य उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. श्री रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापिका सौ.सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापक संतोष कवडे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन ...
पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना; लाभ घेण्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन
Maharashtra

पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना; लाभ घेण्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन

पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना; लाभ घेण्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन लोकसंवाद-२०२६ उपक्रमातून शासकीय योजनांची माहिती; विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इंटरनेटच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४ : शहरी भागातील नागरिकांचे राहणीमान उंचावणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्यावतीने विविध शासकीय आणि स्थानिक पातळीवरील कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांचा शहरातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले. गणेशोत्सवातील भक्तिमय वातावरणाला लोकहिताच्या संवादाची जोड देत शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती पोहोचविण...