Wednesday, October 28

Natioanal

KEM हॉस्पिटलला अश्विनी पाटील यांचे ₹१०.२५ लाख परत करण्याचे आदेश; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
Maharashtra, Politics

KEM हॉस्पिटलला अश्विनी पाटील यांचे ₹१०.२५ लाख परत करण्याचे आदेश; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

₹१०.२५ लाखांच्या परताव्याचे आदेश! आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर निर्णय १५ दिवसांत १० लाख २५ हजार रुपये परत करण्याचे निर्देश पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क : धर्मादाय योजनेअंतर्गत उपचारांचा लाभ न मिळाल्याने पुण्यातील KEM हॉस्पिटलमध्ये १० लाख २५ हजार रुपये भरावे लागलेल्या अश्विनी सोमनाथ पाटील यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धर्मादाय सहआयुक्त तथा देखरेख समितीने संबंधित रुग्णालयाला १० लाख २५ हजार रुपये १५ दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश दिले आहेत. हा आदेश ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पारित करण्यात आला. आमदार अभिजीत पाटील यांनी विधान सभेच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्यासह धर्मादाय सहआयुक्तांकडे लेखी तक्रार करून या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. विधानसभेत रुग्णांच्या हक्कांचा प्रश्न उपस्थित आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि धर्मादाय योजनेसाठी पात्र असलेल्या रुग...
पहिल्या टप्प्यातील १११ कोटी, दुसऱ्या टप्प्यातील ७८ कोटी ४३ लाखांच्या कामांचा आढावा; तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही वेग देण्याच्या सूचना
Maharashtra, Politics

पहिल्या टप्प्यातील १११ कोटी, दुसऱ्या टप्प्यातील ७८ कोटी ४३ लाखांच्या कामांचा आढावा; तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही वेग देण्याच्या सूचना

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला गती द्या; मार्च २०२७ पूर्वी पाणी सुरू करण्याचे आमदार आवताडे यांचे निर्देश पहिल्या टप्प्यातील १११ कोटी, दुसऱ्या टप्प्यातील ७८ कोटी ४३ लाखांच्या कामांचा आढावा; तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही वेग देण्याच्या सूचना मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज: मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती देण्याचे निर्देश आमदार समाधान आवताडे यांनी दिले आहेत.योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत त्यांनी कामातील अडथळ्यांचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यातील पंप हाऊस, मुख्य उर्ध्वगामी नलिका आणि वितरण व्यवस्थेची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. दुसऱ्या टप्प्यातील कामांचे नियोजन करून मार्च २०२७ पूर्वी पाणी सोडण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत,अशा स...
वृद्धत्वाचा मूक हुंदका – हक्क,सन्मान आणि आधारासाठी ज्येष्ठ नागरिकांचा संघर्ष
Maharashtra

वृद्धत्वाचा मूक हुंदका – हक्क,सन्मान आणि आधारासाठी ज्येष्ठ नागरिकांचा संघर्ष

ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, पेन्शन, आरोग्य, आर्थिक सुरक्षितता आणि कौटुंबिक आधार यांवर डॉ. सुनील दादा पाटील यांचा विचारप्रवर्तक लेख ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, पेन्शन, वाढती महागाई, आरोग्यसेवा, एकटेपणा आणि कौटुंबिक उपेक्षा यांवर डॉ. सुनील दादा पाटील यांचा विचारप्रवर्तक लेख. वृद्धांना दया नव्हे, सन्मान, आर्थिक सुरक्षितता आणि आपलेपणाचा आधार हवा. ज्या हातांनी पिढ्या घडवल्या, ज्या पावलांनी देशाच्या विकासाच्या वाटेवर आयुष्यभर प्रवास केला, ज्या डोळ्यांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हजारो स्वप्ने पाहिली आणि ज्या हृदयाने कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा, आकांक्षा आणि सुखांचा त्याग केला - त्याच हातांना, त्याच पावलांना आणि त्याच हृदयाला वृद्धापकाळात आधारासाठी का भटकावे लागावे?हा प्रश्न केवळ एखाद्या वृद्ध व्यक्तीचा नाही. हा प्रश्न आपल्या कुटुंबव्यवस्थेचा आहे, आपल्या सामाजिक मूल्यांचा आहे, आपल्या प्रशास...
दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला द्या साथ,अवघ्या ५० रुपयांत खरेदी करा आकर्षक मेणपणत्या; स्वावलंबनाच्या दिशेने उजळवा आशेचा दीप
Maharashtra

दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला द्या साथ,अवघ्या ५० रुपयांत खरेदी करा आकर्षक मेणपणत्या; स्वावलंबनाच्या दिशेने उजळवा आशेचा दीप

दहा मेणपणत्या फक्त ५० रुपयांत! पंढरपूरच्या दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला साथ देण्याची संधी पंढरपूरच्या शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी आकर्षक मेणपणत्या व मेणबत्त्या तयार केल्या आहेत. १० मेणपणत्यांचे पाकीट फक्त ५० रुपयांत उपलब्ध असून, खरेदीतून विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनाला बळ देण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष मुन्नागिर गोसावी यांनी केले आहे. दिव्यांगत्वावर मात करत कलेतून स्वावलंबनाची भरारी! पंढरपूर | dnyanpravahnews : अंधारावर मात करून प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या दिव्यांची निर्मिती आता दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कुशल हातांतून होत आहे. पंढरपूर येथील लायन्स क्लब पंढरपूर यांच्या अंधविकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला कौशल्याची जोड देत विविध प्रकारच्या आकर्षक मेणपणत्या आणि मेणबत्त्य...
पंढरपुरात एसबीआयचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; लोकमान्य विद्यालयातील २७ गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप
Maharashtra

पंढरपुरात एसबीआयचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; लोकमान्य विद्यालयातील २७ गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

पंढरपूरमध्ये SBI च्या CSR उपक्रमांतर्गत लोकमान्य विद्यालयातील २७ गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम. शाळेचा प्रवास होणार सोपा! पंढरपुरात SBI कडून २७ गरजू विद्यार्थिनींना सायकलींची भेट पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज:मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासा तील अडचणी दूर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया SBI च्या पंढरपूर शाखेने सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम राबविला. बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत लोकमान्य विद्यालयातील २७ गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या शाळेत येण्या- जाण्याचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. शिक्षणासाठी बँकेचा सामाजिक पुढाकार स्टेट बँक ऑफ इंडिया विविध सामाजिक आणि ...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांचा सामाजिक उपक्रम;सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा वाटप
Maharashtra

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांचा सामाजिक उपक्रम;सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा वाटप

सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा वाटप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांचा सामाजिक उपक्रम; शिरनांदगी येथे पशुधनाला दिलासा सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा वाटप. मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि पशुपालक संकटात सापडले असताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पुढाकार घेण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ...
दुष्काळ टळावा,शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, महिला सुरक्षित राहाव्यात; डॉ.नीलम गोऱ्हे यांचे देवीचरणी साकडे
Maharashtra, mumbai

दुष्काळ टळावा,शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, महिला सुरक्षित राहाव्यात; डॉ.नीलम गोऱ्हे यांचे देवीचरणी साकडे

आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी चांदवडच्या रेणुका माता आणि वणीच्या सप्तशृंगी देवीचे दर्शन घेत दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतकरी आत्महत्या रोखणे, महिला सुरक्षा, मंदिर सौरऊर्जा निधी आणि गडांवरील रोपवे सुविधांसाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. आमदार निधीतून दिलेल्या रेणुका माता मंदिराच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या निधीच्या दिरंगाईबाबत अधिवेशनात भूमिका मांडणार; राज्यातील इतर गडांवरील देवस्थानांसाठीही रोपवे सुविधेसाठी प्रयत्न करणार नाशिक | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. १८ ऑक्टोबर : नवरात्रोत्सवानिमित्त शिवसेना नेत्या,विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चांदवड येथील श्री रेणुका माता आणि वणी येथील श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी दुष्काळाचे संकट दूर व्हावे, बळीराजा सुखी व्हावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात आणि महिला व मुलींना सुरक्षित, सन्मानाचे जीवन लाभावे, असे साकडे त्यांन...
मोबाईलच्या जगात हरवलेल्या नात्यांना जोडणारी कादंबरी; आईला निवृत्ती नाही मधून संस्कारांचा जागर
Maharashtra, Reviews

मोबाईलच्या जगात हरवलेल्या नात्यांना जोडणारी कादंबरी; आईला निवृत्ती नाही मधून संस्कारांचा जागर

मोबाईलच्या जगात हरवलेल्या नात्यांना जोडणारी कादंबरी; आईला निवृत्ती नाही मधून संस्कारांचा जागर आईला निवृत्ती नाही : संस्कार पेरणारा अस्सल साहित्यिक दस्तऐवज! आईच्या त्यागाची,कुटुंबव्यवस्थेची आणि हरवत चाललेल्या संवादाची हृदयस्पर्शी कहाणी; डॉ. सुनील दादा पाटील यांच्या कादंबरीतून सामाजिक परिवर्तनाचा संदेश गडहिंग्लज कोल्हापूर | ज्ञानप्रवाह न्यूज :** आई म्हणजे माया, त्याग, प्रेम, सहनशीलता आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी अदृश्य शक्ती! कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखासाठी आयुष्यभर झटणाऱ्या आईच्या वाट्याला मात्र निवृत्ती कधीच येत नाही.तिच्या जबाबदाऱ्या,काळजी आणि कुटुंबा विषयीची ओढ आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कायम राहते.याच भावविश्वाचा वेध घेणारी डॉ. सुनील दादा पाटील यांची आईला निवृत्ती नाही ही कादंबरी म्हणजे कौटुंबिक संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करणारा आणि वाचकाला अंतर्मुख करणारा ...
सुधाकरपंत परिचारक यांचे कर्तृत्व मुख्यमंत्रिपदाच्या योग्यतेचे;परिचारक परिवारातील नेता पंढरपूरचा पहिला कॅबिनेट मंत्री व्हावा – सादिक खाटीक
Maharashtra

सुधाकरपंत परिचारक यांचे कर्तृत्व मुख्यमंत्रिपदाच्या योग्यतेचे;परिचारक परिवारातील नेता पंढरपूरचा पहिला कॅबिनेट मंत्री व्हावा – सादिक खाटीक

सुधाकरपंत परिचारक यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटीक यांनी त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्याचा गौरव केला. परिचारक परिवारातील नेत्याने पंढरपूरचा पहिला कॅबिनेट मंत्री व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली सादिक खाटीक यांचे गौरवोद्गार; सुधाकरपंतांच्या सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील योगदानाला उजाळा पंढरपूर/आटपाडी | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ : सोलापूर जिल्ह्याचे लोकनेते, पंढरपूरचे दिवंगत नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कर्तृत्व राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या योग्यतेचे होते. राजकारण, समाजकारण,शिक्षण, सहकार,व्यापार,उद्योग आणि शेती अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या परिचारक परिवारातील एखाद्या सर्वमान्य नेत्याने पंढरपूरचे प्रतिनिधित्व करत राज्याचा पहिला कॅबिनेट मंत्री व्हावे, अशी भावना कुर...
धुळ्यात Coffee with Satyajeet उपक्रमातून Gen Z आणि तरुण- तरुणींशी साधला मनमोकळा संवाद
Maharashtra, Politics

धुळ्यात Coffee with Satyajeet उपक्रमातून Gen Z आणि तरुण- तरुणींशी साधला मनमोकळा संवाद

तरुणांच्या कल्पनांना कृतीची जोड देण्यासाठी Younnovation Centre ठरणार हक्काचं व्यासपीठ – आमदार सत्यजीत तांबे तरुणांच्या कल्पनांना मिळणार कृतीची जोड! पाच जिल्ह्यांत Younnovation Centre उभारणार; सत्यजीत तांबे यांची धुळ्यात घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘Coffee with Satyajeet’ उपक्रमातून धुळ्यात Gen Z आणि तरुणांशी संवाद. नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये Younnovation Centre च्या माध्यमातून शिक्षण, उद्योजकता, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. धुळे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ ऑक्टोबर २०२६ : जळगावनंतर आज धुळे येथे Coffee with Satyajeet या संवाद मालिकेच्या माध्यमातून आमदार सत्यजीत तांबे यांनी विविध क्षेत्रांतील विद्यार्थी, Gen Z आणि तरुण-तरुणींशी मनमोकळा संवाद साधला.शिक्षण, रोजगार, व्यवसाय,शेती आणि तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर झालेल्या य...