Thursday, October 29

Maharashtra

पंढरपुरात निराधार महिलां साठी पालवी अपना घर; आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक यांच्या हस्ते गृहप्रवेश
Maharashtra

पंढरपुरात निराधार महिलां साठी पालवी अपना घर; आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक यांच्या हस्ते गृहप्रवेश

पालवी अपना घर च्या नूतन वास्तूचा गृहप्रवेश; निराधार महिलांना मिळणार सुरक्षिततेचे आणि सन्मानाचे छत पंढरपूरमध्ये प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलित ‘पालवी अपना घर’च्या नूतन वास्तूचा आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांच्या हस्ते गृहप्रवेश. निराधार महिलांसाठी सुरक्षित निवाऱ्याची सुविधा. पालवी अपना घर च्या नूतन वास्तूचा गृहप्रवेश; निराधार महिलांसाठी मायेचे छत उभे वैद्यकीय सुविधा, रस्ता व वीजपुरवठ्यासाठी सहकार्याची ग्वाही पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ सप्टेंबर २०२६ : पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने चंद्रभागा नदीकाठ, घाट तसेच शहरातील विविध भागांत निराधार आणि मनोरुग्ण व्यक्तींना सोडून देण्याचे प्रमाण असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत मनोरुग्ण, निराधार आणि आधाराची गरज असलेल्या महिलांसाठी सुरक्षित निवारा व सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रभा हिरा प्रतिष्...
लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय-स्मारकाला रामदास आठवले यांची भेट; दुरुस्ती व संवर्धनासाठी पाठपुरावा
Maharashtra, mumbai

लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय-स्मारकाला रामदास आठवले यांची भेट; दुरुस्ती व संवर्धनासाठी पाठपुरावा

लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय-स्मारकाला रामदास आठवले यांची भेट; दुरुस्ती व संवर्धनासाठी पाठपुरावा लंडनमधील डॉ.आंबेडकर संग्रहालयाच्या संवर्धनासाठी रामदास आठवले यांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय-स्मारकाला भेट दिली. स्मारकाच्या दुरुस्ती, संवर्धनासह व्हिडिओ दालनाची सूचना लंडन / मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २० सप्टेंबर २०२६ : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय-स्मारकाला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्मारकाची पाहणी करून त्याच्या संवर्धन आणि देखभालीसंदर्भात काही सूचना मांडल्या. लंडनमधील 10 King Henry’s Road हे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित
Maharashtra

पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराजवळ आशीर्वादाचा दिवा; मोदींच्या २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल कृतज्ञता सेवा संकल्प अभियान : पंढरपुरात प्रज्वलित झाला आशीर्वादाचा दिवा;भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती पंढरपूरमध्ये सेवा संकल्प अभियान अंतर्गत भाजपा कार्यकर्ते अक्षय वाडकर यांच्या पुढाकाराने श्री विठ्ठल मंदिर पश्चिमद्वाराजवळ आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करण्यात आला. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या समर्पित जनसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभरात सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत पंढरपूर येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करण्यात आला. श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिराच्या पश्चिमद्वार परिसरात १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजप...
सरकोली पर्यटनस्थळाच्या विकासाला मोठी गती; नवीन पूल,चारपदरी रस्ता,पर्यटन सुविधांसाठी हालचाली
Maharashtra

सरकोली पर्यटनस्थळाच्या विकासाला मोठी गती; नवीन पूल,चारपदरी रस्ता,पर्यटन सुविधांसाठी हालचाली

सरकोली पर्यटनस्थळाच्या विकासाला मोठी गती; नवीन पूल, चारपदरी रस्ता अन् पर्यटन सुविधांसाठी हालचाली ड्रोन सर्व्हेनंतर सरकोलीच्या विकासाचा डीपीआर; रस्ते, पूल आणि पर्यटक सुविधांना मिळणार नवी दिशा सरकोली कृषी व तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाच्या विकासाला गती; रस्ते, नवीन पूल, चारपदरी मार्ग, पर्यटक निवास, नाना नाणी पार्क आणि इतर सुविधांसाठी शासकीय प्रक्रिया सुरू. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ सप्टेंबर २०२६ : सरकोली ता. पंढरपूर येथील कृषी व तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाच्या विकासकामांना गती देण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असून दळणवळण व्यवस्था मजबूत करण्याबरोबरच पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने शासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार मिनलताई सुधीर भोसले,सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सचिव सुधीर साहेबराव भोसले, डाळिंब रत्न दत...
रक्तदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आंबवड्यात ५७ जणांनी दिले रक्त,रक्तदात्यांना ५ लाखांचे विमा संरक्षण
Maharashtra

रक्तदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आंबवड्यात ५७ जणांनी दिले रक्त,रक्तदात्यांना ५ लाखांचे विमा संरक्षण

रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश; आंबवडेत ५७ रक्तदात्यांचे योगदान स्वराज्यभूमी प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना ५ लाखांचे अपघाती विमा संरक्षण आंबवडे,ता.भोर | ज्ञानप्रवाह न्यूज , दि.१९ सप्टेंबर २०२६ : गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजात जनजागृती निर्माण व्हावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्वराज्यभूमी प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ आंबवडे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार,दि.१८ सप्टेंबर रोजी कान्होजी जेधे सभागृह, आंबवडे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ५७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. हे रक्तदान शिबिर भोर-वेल्ह्याचे माजी आमदार तसेच रायरेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे जनक स्व.मा. संपतराव रामचंद्र जेधे आणि कै. सुमन सं...
सोलापुरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक;सोन्याचे दागिने, रोकड,मोटारसायकल जप्त
Crime, Maharashtra, Police

सोलापुरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक;सोन्याचे दागिने, रोकड,मोटारसायकल जप्त

सोलापूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी व चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक; सोन्याचे दागिने, रोकड, साडी आणि मोटारसायकलसह ₹७८ हजारांचा मुद्देमाल जप्त. सोलापुरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक; सोन्याचे दागिने,रोकड आणि मोटारसायकल जप्त CCTV फुटेजने उलगडला घरफोडीचा तपास; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात,७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज : घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांतील पाहिजे असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.नितीन बाबू भोसले आणि कमलाकर यशवंत पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, साड्या आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि.२४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० ते २५ ऑगस्ट रोजी सकाळी ७...
सरकारी योजना आता थेट गावाच्या दारात; पंढरपूर तालुक्यात सेवा संकल्प अभियान ला सुरुवात
Maharashtra, Politics

सरकारी योजना आता थेट गावाच्या दारात; पंढरपूर तालुक्यात सेवा संकल्प अभियान ला सुरुवात

फक्त योजना सांगणार नाही, थेट लाभ मिळवून देणार; पंढरपूरमध्ये सेवा संकल्प अभियान चा शुभारंभ पंढरपूर तालुक्यात सेवा संकल्प अभियान ला सुरुवात.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर सरकारी योजनांचा लाभ, नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित कामांवर प्रशासनाचा भर पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज: सरकारी सेवा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी तसेच गावागावातील स्थानिक गरजा ओळखून विकासकामांना लोकसहभागाची जोड देण्यासाठी पंचायत समिती पंढरपूरच्या वतीने सेवा संकल्प अभियान सुरू करण्यात आले आहे. पंचायत समितीच्या शेतकी भवन सभागृहात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर पंचायत समितीचे सभापती डॉ शुभम आगावणे होते. प्रमुख अतिथी म्हणू...
गौरी पूजनानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुवर्ण अलंकारांची झळाळी; मनोहारी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी
Maharashtra

गौरी पूजनानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुवर्ण अलंकारांची झळाळी; मनोहारी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी

श्री गौरी पूजनानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठ्ठल, रुक्मिणी माता व महालक्ष्मी मातेस पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी गौरी पूजनानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुवर्ण अलंकारांची झळाळी; मनोहारी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. सोन्याचा मुकुट,चंद्रहार,लक्ष्मीहार अन् हिऱ्याचे कंगन; गौरी पूजना निमित्त विठ्ठल-रुक्मिणी - महालक्ष्मीचे विलोभनीय रूप पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ सप्टेंबर २०२६ : श्री गौरी पूजना निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल,रुक्मिणी माता आणि महालक्ष्मी मातेस आकर्षक व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले.सुवर्ण अलंकारांनी नटलेले तिन्ही देवतांचे मनोहारी रूप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी मंदिरात भाविकांची ...
महिला सुरक्षेसाठी कडक कायदे पुरेसे नाहीत; जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट अनिवार्य करा : डॉ.नीलम गोऱ्हे
Maharashtra

महिला सुरक्षेसाठी कडक कायदे पुरेसे नाहीत; जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट अनिवार्य करा : डॉ.नीलम गोऱ्हे

महिला महिला सुरक्षेसाठी कडक कायदे पुरेसे नाहीत; जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट अनिवार्य करा : डॉ.नीलम गोऱ्हे महिला सुरक्षेसाठी कडक कायद्यांसोबत जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट अनिवार्य करण्याची मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. दिल्लीतील अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचार-हत्या प्रकरणी कालबद्ध तपास व तातडीच्या न्यायासाठी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करणार. दिल्लीतील स्वरूपनगर प्रकरणात चार संशयित ताब्यात असून त्यापैकी तीन अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दिल्लीतील अल्पवयीन मुलीच्या प्रकरणानंतर डॉ.नीलम गोऱ्हेंची मागणी;महिला सुरक्षेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वतंत्र बजेट हवे मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ सप्टेंबर २०२६ : एका बाजूला समाजातील ऐक्य,एकोपा,सौख्य आणि सुरक्षिततेसाठी आपण गणरायाकडे प्रार्थना करीत आहोत. गौरींचेही मंगलमय आगमन झाले आहे.मात्र याच काळात दिल्लीतील स...
बाप्पाचा निरोपही पर्यावरणपूरक! प्रभा निवासस्थानी घरच्या घरी हौदात गणेश विसर्जन
Maharashtra

बाप्पाचा निरोपही पर्यावरणपूरक! प्रभा निवासस्थानी घरच्या घरी हौदात गणेश विसर्जन

संगमनेर येथील प्रभा निवासस्थानी आमदार सत्यजीत तांबे आणि डॉ. मैथिली तांबे यांनी घरच्या घरी हौद तयार करून गणेश विसर्जन केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत जलप्रदूषण टाळण्याचे केले आवाहन जलप्रदूषण टाळण्यासाठी तांबे परिवाराचा आदर्श! घरच्या हौदात गणरायाला भावपूर्ण निरोप संगमनेर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. १८ सप्टेंबर २०२६ : आज तांबे परिवाराने प्रभा या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात पर्यावरण पूरक पद्धतीने निरोप दिला.यावेळी आमदार सत्यजीत तांबे आणि संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ.मैथिली सत्यजीत तांबे यांनी घरीच हौद तयार करून त्यामध्ये गणरायाचे विसर्जन केले. गेल्या पाच दिवसांपासून प्रभा निवासस्थानी गणरायाच्या आगमनामुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. यंदाचा गणेशोत्सव तांबे पर...